इंद्रावती नदीपात्रात दुर्मीळ रानम्हशींचे दर्शन

0
21

वन्यप्राणी प्रगणनेदरम्यान कमलापूर वनपरिक्षेत्रातील पेनकसा भागात
अशोक दुर्गम,सिरोंचा,दि.२१ः-गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा उपवनविभागातील कमलापूर वनपरिक्षेत्रातील खंड क्रमांक ५४(पेनकसा)भागात वन्यप्राणी प्रगणनेकरीता वनकर्मचारी पाऊलवाटेने जात असतांना इंद्रावती नदीपात्रात दुर्मिळ रानम्हशीं आढळून आल्या.विशेष म्हणजे कमलापूर वनपरिक्षेत्रातील १४० वर्गकिमीच्या क्षेत्रात रानम्हशींच्या संवर्धनासाठी २०१२ मध्ये कोलामार्का संवर्धन क्षेत्र घोषीत करण्यात आले होते.त्यावेळी या क्षेत्रात १२ रानम्हशींची संख्या होती.आता मात्र ही संख्या २८ च्यावर पोचली असून प्रगणनेदरम्यान वनकर्मचाèयांनी रानम्हशींनी खालेले गवत,वनस्तपतीचे नमुने,तसेच रानम्हशीची विष्ठा सुध्दा गोळा केली.महाराष्ट्राला लागूनच छत्तीसगड असल्याने या रानम्हशींचे इकडे तिकडे आवागमन सुरुच असते.त्यातच नव्याने नदीपात्राशेजारी आढळलेल्या या रानम्हशींच्या नव्या प्रकारामुळे पर्यटकांना सुध्दा आकर्षणाचे ठिकाण ठरणार आहे.त्यातच गोळा करण्यात आलेले नमुणे प्रयोगशाळेत पाठवून वैद्यकीय परिक्षणानंतरच या रानम्हशीसंदर्भांत अधिक माहिती मिळणार असल्याची माहिती सिरोंचा वनविभागाचे उपवनसरक्षंक तुषार चव्हाण यांनी दिली आहे.