भुजबळांच्या पुतण्याला महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी समन्स

0
12

मुंबई – महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या पुतण्याला दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात कथित घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावले आहेत.

एसीबीचे संचालक प्रविण दिक्षित यांनी सदन घोटाळ्याप्रकरणी भुजबळ यांचा पुतण्या समीरला पुढील आठवड्यात जबाब नोंदवण्यासाठी आदेश देण्यात आल्याची माहिती दिली. तसेच आवश्यकता असल्यास छगन भुजबळ आणि त्यांचा मुलगा पंकज यांनाही पुढील काही दिवसांत चौकशीस बोलावण्यात येईल असे एसीबीच्या अधिका-याने सांगितले.

माजी सार्वजनिक बांधकाममंत्री असलेल्या भुजबळ यांनी सरकारी आणि खासगी भागिदारीतून दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचे बांधकाम केले होते. या बांधकामात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याची टीका झाली होती. याप्रकरणी एसीबी चौकशी करत आहे.