राज्यात स्वाईन फ्लूचा हाहाकार, ८३ जणांचा मृत्यू

0
5

मुंबई- राज्यात स्वाईन फ्लूच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गुरूवारी एका दिवसात १०९ नवे रूग्ण आढळून आले असून एकूण रूग्णांची संख्या ६७८ वर पोहचली आहे. मृतांची संख्या ८३ झाली आहे. गुरूवारी ४ रूग्णांचा मृत्यू झाला असून त्यापैकी दोन हे नागपूरचे तर पुणे आणि लातूरमध्ये प्रत्येक एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत स्वाईन फ्लूची लागण झालेल्या रूग्णांची संख्या २४४ झाली आहे. गुरूवारी १९ नवे रूग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. मुंबईत मृतांची एकूण संख्या १० वर गेली आहे. स्वाईन फ्लूचा सर्वात जास्त फटका नागपूरला बसला आहे.
बुधवारी राज्यात स्वाईन फ्लूच्या रूग्णांची संख्याी ५६९ येवढी होती. एका दिवसात ती जवळपास शंभरने वाढून ती ६७८ वर गेली आहे. सध्या राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात स्वाईन फ्लूची लागण झालेले जवळपास ४० रूग्ण हे व्हेंटीलेटरवर आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.