आदिवासी मुलींना भोगाव्या लागताहेत वसतिगृहात नरकयातना

0
26

मुलींना वसतिगृहात सोडून गृहपाल करतात घरी आराम
सुखसुविधांविना असलेले मुलींच्या वसतिगृहाकडे प्रकल्प अधिकार्याचे दुर्लक्ष

खेमेंद्र कटरे
गोंदिया : आदिवासी मुलींना समाजाच्या मुख्य प्रवाहात जोडण्यासाठी, शिक्षणाच्या माध्यमातून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासकीय वसतिगृहांची स्थापना करण्यात आली. मात्र, वसतिगृहात राहणाèया मुलींना सुविधांच्या अभावामुळ नरकयातनाच सहन करण्याची वेळ आली आहे.एकीकडे खासदाराला चांगल्या सुविधा आणि निटनेटकपेणा असलेले मुलींचे वसतिगृह दाखवून प्रकल्प विभागाच्या अधिकाèयांनी आपली पाठ थोपटून घेतली होती.खासदार नाना पटोले यांच्या सिव्हिल लाईन स्थित मुलींच्या वसतिगृहाला भेट देऊन आठवडा होत नाही,तर रेलटोलीस्थित पालचौकातील मुलींच्या वसतिगृहातील ढिसाळपणा समोर आल्याने आदिवासी विभागाच्या कामकाजाची लक्तरेच वेशीवर टांगली गेली आहेत.मुलींना धाक दाखवून चुकांवर पांघरून घालण्याचे काम प्रशासनातर्फे सुरू असतानाच या मुलींना मात्र परिचराच्या भरोश्यावर ठेवून वसतिगृह अधिक्षिका गैरहजर राहत आहेत.
आदिवासी मुलींच्या वसतिगृहावर लाखोंचा खर्च होत असल्याने त्या निधीचा योग्य वापर दिसून येत नसल्याने आदिवासी उत्थानाचा निधी जातो कुठे? असा गंभीर प्रश्न समोर आला आहे. रेलटोली स्थित वसतिगृहांच्या मुलींनी सांगितलेली आपबीतीही अशीच थक्क करणारी आहे.
देवरी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत जिल्ह्यात अनेक ठिकाणी आदिवासी मुला-मुलींसाठी वसतिगृहे उभारण्यात आली आहेत. मात्र, येथील समस्यांकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याने आदिवासी विद्याथ्र्यांना गैरसोईंचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील सिव्हिल लाइन परिसरातील मुलांच्या वसतिगृहातील अन्नात चक्क अळ्यांचा भरणा असल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणावर सारवासारव होत नाही तोच पुन्हा रेलटोली येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहात राहणाèया मुलींच्या व्यथा समोर आल्याने प्रकल्प कार्यालयाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. समस्यांना वाचा फोडणाèया मुलींना दमदाटी देखील तेवढीच होत असल्याने समस्या सांगायला देखील त्यांना मागे-पुढे बघावे लागत आहे. १७ फेबुवारीला सकाळी ११ वाजतापासून चक्क रात्रीच्या ९ वाजेपर्यंत वसतिगृहातील विद्युत पुरवठा खंडीत होता. मुली अंधारातच प्रकाशाची वाट बघत राहिल्या मात्र, विद्युत तर दूरच त्यांच्या समस्या ऐकायला देखील कोणीच नव्हते. दरम्यान विद्युत मोटर बंद असल्याने साधे पिण्याचे पाणी देखील मुलींच्या नशिबी नव्हते. शेवटी येथील मुलींनी गृहपालांशी संपर्क साधला असता समाधान कारक उत्तर मिळू शकले नसल्याची खंत सदर मुलींनी व्यक्त केली. समस्या घेऊन गेल्यास संबंधितांकडून समाधानकारक उत्तर मिळण्याऐवजी उद्धट प्रकारचे प्रतिउत्तर मिळत असल्याचेही मुलींनी सांगितले. अशी तक्रार देखील मुलींनी देवरी येथील प्रकल्प अधिकारी तथा आदिवासी विभागाच्या राज्यमंत्र्यांकडे करूनही समस्यांचे निराकरण न झाल्याने अन्यायग्रस्त मुलींनी आपली आपबीती प्रसारमाध्यमां समोर व्यक्त केली. वसतिगृहातील विद्युत बंद झाल्यावर प्रकाशाची कसलीही पर्यायी व्यवस्था नाही. मुलींना अंधाराचा सामना करावा लागतो, मागील ३ महिन्यांपासून निर्वाह भत्ता मिळाला नाही,डड्ढेसकोडचे पैसे देखील मिळाले नाही. गृहपाल पाहण्यांसारखे आठवड्यातून २ दिवस वसतिगृहात येतात. मात्र, मुलींच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात. मुलींची प्रकृती खालावल्यास कर्मचारी वर्ग रुग्णालयात नेत नाही. अशी तक्रार अन्यायग्रस्त मुलींनी प्रकल्प अधिकाèयांकडे ५० मुलींच्या स्वाक्षरीनिशी केली. दरम्यान आज (दि.१९) मुलींनी सांगितले की, बेडच्या अपूर्ण व्यवस्थेमुळे मुलींना जमिनीवर झोपावे लागत आहे. पुस्तकांचे कपाट नसल्याने बेडवरच पुस्तकांचे ढीग, त्यातही एका बेडवर दोन मुलींना अडचणीत झोपावे लागते. अनेक बेडचे प्लाय तुकडे व निकृष्ट दर्जाचे असल्याने अनेकदा बेडवरुन काही मुली खाली पडल्याच्या घटनाही घडल्याचे सांगितले. तब्बल ३० ते ३५ मुलींसाठी १ ते २ बॉथरुम असल्याने आंघोळीसाठी रांगा लागतात दिवसभर आंघोळीचे सत्र सुरू असते. मग आम्ही शाळेत जायचे कसे? असा प्रश्न मुलींनी उपस्थित केला आहे. वसतिगृहात वाचनालय, संगणकांची व्यवस्था नाही, २ महिन्यांपासून वसतिगृहात सफाईसाठी फिनाईल नाही, पाण्याची व्यवस्था बरोबर नाही, पाण्याच्या टाक्यांना झाकण नसल्याने दूषित पाणी मुलींच्या नशिबी आहे. टँकमधील पाण्याला शैवाळ लागल्याचे चित्र डोळ्यासमोर दिसले.
त्यामुळे मुलींचे आरोग्य धोक्यात आले आहे. लिहिण्यासाठी टेबल, खुच्र्या काहीच नाही, अनेक विद्युत पंखे देखील बंद पडून आहेत. स्वयंपाकाच्या धुराने इमारत देखील काळी पडली आहे. आदिवासींच्या उत्थानाच्या नावावर कोट्यवधी उधळले जात आहे. मग हा निधी जातो कुठे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एकीकडे खासदारांना शहरातील व्यवस्थित अवस्थेत असलेले वसतिगृह स्वत:चा उदो-उदो करण्यासाठी दाखवले गेले तर दुसरे वसतिगृह मात्र आपल्या दुरावस्थेवर अश्रू ढाळत आहे. कदाचित या वसतिगृहाला खासदारांनी भेट दिली असती तर खरे बिंग फुटले असते.
आदिवासींच्या उत्थानाचा उदो-उदो करणारे प्रकल्प कार्यालय आदिवासी वसतिगृहांना वाèयावर सोडत असल्याने आदिवासींच्या नशिबी अंधारच आहे. परिणामी त्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले आहे. अहो, साहेब आमच्या समस्या सोडवा असा टाहो आदिवासी वसतिगृहाच्या मुली फोडू लागल्या आहेत. समस्यांची कितपत दखल प्रकल्प कार्यालय घेते याकडे या मुलींचे लक्ष लागले आहे.