रेल्वे अर्थसंकल्पाचे अखेरचे वर्ष?

0
10

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २२ फेब्रुवारी
रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे मांडला जाण्याचे हे शेवटचे वर्ष ठरण्याची शक्यता आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पुढील वर्षापासून रेल्वे अर्थसंकल्प थेट सामान्य अर्थसंकल्पाअंतर्गतच मांडला जाणार आहे.
रेल्वेपेक्षा अधिक मोठे अंदाजपत्रक असणारी अन्य मंत्रालयेही आहेत. मग रेल्वे मंत्रालयाचाच स्वतंत्र अर्थसंकल्प तयार करण्याची गरज नसल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. त्यासोबतच, सहास्तरीय रेल्वे मंडळाच्या पुनर्स्थापनेसाठी एक समिती स्थापण्यात आली आहे.