स्थानिक सुट्टी जाहिर

0
25

गोंदिया, दि ९ : जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन सन २०१५ या वर्षामध्ये स्थानिक सुट्‌या जाहिर केल्या आहेत. २१ एप्रिल २०१५ रोजी अक्षयतृतीया, १२ ऑक्टोबंर रोजी पितृमोक्ष अमावश्या व १० नोव्हेंबर रोजी नरकचतुदशी (दिवाळी) या स्थानिक सुट्ट्यांचा समावेश आहे. जिल्हयातील दिवाणी व फौजदारी न्यायालय आणि अधिकोष (बँक) यांना ह्या सुट्टया लागू होणार नसल्याचे कळविण्यात आले आहे.
००००००००