कोचिंग क्लासेस व दोन व्यापाऱ्यांवर आयकर विभागाची धाडी

0
12

नांदेड -शहरात तीन शिकवणी वर्ग एक इलेक्ट्रीकल्स दुकान व एका सराफा व्यापाऱ्याकडे आयकर विभागाने धाड टाकली असून वृत्त लिहिपर्यंत तपासणी सुरूच होती.

नांदेड शहराच्या बाबानगर भागात अनेक शिकवणी वर्ग आहेत. आज आयकर विभागाने कल्याणकर कोचिंग क्लासेस,देशपांडे कोचिंग क्लासेस आणि कृष्णा कोचिंग क्लासेस या तीन शैक्षणिक संस्थावर धाड टाकली. तसेच तारासिंह मार्केटमध्ये असलेल्या चंदनानी इलेक्ट्रीकल्स या दुकानावर आणि सराफ व्यापारी बाकलीवाल यांच्या दुकानावर धाड टाकली आहे.

आयकर विभागाला लपवून केलेल्या प्राप्तीवर अशा प्रकारे आयकर विभागाने अचानक तपासणी करून खरी प्राप्ती जाणून घेण्याचा प्रकार नियमात आहे.सायंकाळी वृत्त लिहिपर्यंत ही तपासणी सुरूच होती.त्यामुळे या लोकांकडून किती अधिकची आय मिळाली याची माहिती मिळू शकली नाही.विशेष म्हणजे या पाचही प्रतिष्ठाणांवर जालना येथील आयकर विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावतीन तपासणी सुरू आहे.