झारखंडमध्ये पाच नक्षलींना कंठस्नान; मोठा शस्त्रसाठा जप्त

0
11

रांची- झारखंडमधील नक्षल प्रभावित गुमला जिल्ह्यात पोलिसांनी आज (शुक्रवारी) पाच नक्षलींना कंठस्नान घातले. पोलिस आणि नक्षलींमध्ये अद्याप गोळीबार सुरु आहे. पोलिसांनी या कारवाईत मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. दुसरीकडे, राज्यातील अनेक जिल्ह्यात नक्षलींनी कारवाया सुरु झाल्याची माहिती मिळाली आहे.
एएसपी पवन सिंह यांनी दिलेली माहिती अशी की, नक्षली आणि पोलिसांत गुमला जिल्ह्यातील चैनपूर भागातील लुरु सतरीच्या जंगलात नक्षलींना घेरले. पोलिसांना पाहाताच 80-90 माओवाद्यांनी गोळीबार केला. पोलिसांनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिले. पोलिसांनी पाच नक्षलींना ठार मारले असून त्यांच्याकडून एक अमेरिकन रायफल, 150 काडतुसे आणि एक हँड ग्रेनेड जप्त केले आहे.
लुरु सतरीच्या जंगलात कुख्यात माओवादी नेता अरविंद हा लपला आहे. तसेच त्याच्यासोबत शेकडो साथीदार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.गिरिडीह जिल्ह्यातील थांसीडीह पिकेटमधील ढिबरा मायका खाणीवर शुक्रवारी नक्षलींनी हल्ला चढवला. यात मजूराचा मृत्यु झाला असून सहा जण जखमी झाले आहे. नक्षलींनी एक ट्रॅक्टर आणि जेसीबी मशीनला आग लावली.
पलामू जिल्ह्यातील पांकी येथे 20 किलोचे कॅन बॉम्ब पोलिसांनी जप्त केला आहे. नंतर हा बॉम्ब डिफ्युज करण्यात आला. तसेच लोहरदगामधील इटमा आणि बंजारीमध्ये आयईडी बॉम्ब पोलिसांनी जप्त केला.
बोकारोमधील झुमरा भागात पोलिसांनी सुरु केलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त करण्‍यात आला आहे. दोन हँड ग्रेनेड, 10 कॅन बॉम्ब, एके 47च्या 111 गोळ्या. एक एके 47 रायफल जप्त करण्‍यात आले. बोकारोचे एसपी ए विजयालक्ष्मी यांनी सांगितले की, पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरु आहे.