राष्ट्रवादीच्यावतीने रेशनच्यामुद्याला घेऊन नागपूरात आंदोलन

0
7

नागपूर-जिल्ह्यासह शहरातील रेशन दुकानात मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असून दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) कार्डधारकांनाही अन्नधान्य वाटप केले जात नाही. तसेच राज्य सरकारने १ कोटी ७५ लाख दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) कार्डधारकांना स्वस्त अन्नधान्यापासून वंचित केले. या अन्यायाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या नेतृत्वाखाली आणि पूर्व नागपूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. रेशन दुकानांच्या मागण्यांवर पूर्व नागपूरची जनता आक्रमक दिसून आली, धरणे आंदोलनात महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी प्रत्यक्ष भेटून आंदोलनकर्त्यांच्या भावना समजून घेत त्यांच्या मागण्याचे निवेदन स्विकारले.निवेदनात रूपये २० हजारांखालील उत्पन्न असलेल्या द्रारिद्र्य रेषेखालील कार्डधारकांना गेल्या चार महिन्यांपासून स्वस्त दरातील धान्य मिळालेले नसून ते लवकरात लवकर मिळवून देण्यात यावे. प्राधान्य गटातून अनेक द्रारिद्र्य रेषेखालील लाभार्थी जाणीवपूर्वक वगळण्यात आले असून उच्च उत्पन्न गटातील लोकांचा प्राधान्य गटामध्ये समावेश करून मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याचा काळाबाजार होत आहे. तो त्वरित थांबवून दोषींवर कारवाई करावी. लवकरात लवकर द्रारिद्र्य रेषेखालील लोकांचा पुन्हा एकदा सर्वे करून गरीब लोकांना न्याय मिळवून द्यावा.
रॉकेल, तेलाचे पुन्हा वाटप सुरू करावे (कोटा कमी केल्यामुळे अनेक लोकांना तेलच मिळत नाही. द्रारिद्र्य रेषेवरील (एपीएल) बंद केलेले अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत पुन्हा स्वस्त दरात अन्नधान्य द्यावे,या मागण्यांचा समावेश होता.आंदोलन प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार दिनानाथ पडोळे, ईश्वर बाळबुधे, प्रशांत बनकर, राजेश माकडे, विशाल खांडेकर, शैलेंद्र तिवारी, दिनकर वानखेडे, नरेन्द्र पुरी, जगदीश पंचबुधे, राहुल कांबळे, संतोष सिंह, पिंकी वर्मा, रबिया शहा, वर्षा शामकुळे, उर्वशी गिरडकर, आनंदी बावनकर, प्रमीला यादव आणि प्रभा खापेकर यांच्यासह असंख्य राष्ट्रवादी कार्यकर्ता, महिलांनी भाग घेतला होता.