डॉ. सिद्धार्थ काणे नवे कुलगुरू

0
7

नागपूर,दि.7-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदावर सांख्यिकी विभाग प्रमुख डॉ. सिद्धार्थ काणे यांची राज्यपाल व कुलपती सी. विद्यासागर राव यांनी मंगळवारी नियुक्ती केली. डॉ. काणे यांच्यारूपाने विद्यापीठाला स्थानिक नेतृत्व मिळाले आहे. डॉ. काणे यांना विद्यापीठाच्या विविध प्राधिकारणी आणि प्रशासकीय पदांवरील कार्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्या निवडीने विद्यापीठात आनंद व्यक्त होत आहे.

कुलगुरू शोध समितीचे अध्यक्ष सुप्रीम कोर्टातील सेवानिवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी पाच जणांची नावे कुलपतींना शिफारस केली होती. त्यात विद्यापीठातील सांख्यिकी विभागचे प्रमुख डॉ. सिद्धार्थ काणे, कराड येथील शासकीय इंजिनीअरिंग कॉलेजचे प्राचार्य पी.एम. खोडके, मुंबई विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय देशमुख, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील बायोटेक विभागाचे प्रमुख महेंद्रकुमार राय आणि नांदेड येथील एक प्राध्यापकाचा समावेश होता. त्या पाचही जणांच्या प्रत्यक्ष मुलाखती कुलपतींनी घेतल्या. त्यानंतर संध्याकाळी डॉ. काणे यांची कुलगुरूपदावर नियुक्ती केल्याची घोषणा करण्यात आली.
नागपूर विद्यापीठाला गेल्या १० वर्षानंतर डॉ.सिद्धार्थ काणे यांच्या रूपाने स्थानिक कुलगुरू मिळाला आहे. यापूर्वी भूगर्भशास्त्र विभागातील प्र-पाठक डॉ. अरुण सातपुतळे हे कुलगुरू झाले होते. त्यानंतर डॉ. श. नू. पठाण आणि डॉ. विलास सपकाळ हे विद्यापीठाबाहेरील व्यक्ती कुलगुरू झाले होते.