जलयुक्त शिवारच्या ३४ कामांच्या ईनिविदेत शासन निर्णयाला बगल

0
12

गोंदिया जि.प.च्या विशेष स्थायी समितीच्या शुक्रवारच्या सभेत विषय गाजणार
जलसंधारणाच्या अधीक्षक अभियंताच्या पत्राला कृषी सहसंचालकानी दाखवला ठेंगा
खेमेंद्र कटरे
गोंदिया-पाण्याची टंचाई दूर होऊन शेतीला व जनावरांना पाण्याची सोय व्हावी,दुष्काळावर मात करता यावे,या उद्देशाला घेऊन जलयुक्त शिवार योजना राज्य सरकारने अमलांत आणली.त्यातच ही कामे (सीएनबी)सिमेंट नाला बंधाराची कामे ही फक्त जलसंधारण विभागाने करण्याचे स्पष्ट निर्देश ५ फेबुवारी १५ च्या शासन निर्णयात असताना विभागीय कृषी सहसंचालकांनी आपल्या स्तरावर ईटेडरींग केल्याचा प्रकार समोर आला आहे.
या कामाच्या ईटेडरींगसाठी ही कामे जलसंधारण विभागाला सोपविण्याचे पत्र अधीक्षक अभियंता दि.दे.पोहेकर यांनी दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करीत कृषी सहसंचालकानी आपल्या स्तरावर जलयुक्त शिवार योजनेअतंर्गत सिमेंट नाला बंधारे बांधकामाचे ईटेंडर एकत्र काढल्याने गोंदिया जिल्ह्यात खळबळ माजली आहे.सदर विषय उद्या गोंदिया जिल्हा परिषदेच्या होणाèया विशेष स्थायी समितीच्या बैठकीत गाजण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेच्या नावावर ७३ कामे मंजूर आहेत.यापैकी ५० कामे ही जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाची व २३ कामे स्थानिक लघू पाटबंधारे विभागाची होती.त्या कामांना जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट करून शासनाला सादर करण्यात आले.या योजनेसाठी जिल्ह्याला ९ कोटी १२ लाख रुपयाचा निधी प्राप्त झाला.त्यापैकी ७३ सिमेंट नाला बंधारे बांधकामासाठी सुमारे साडे आठ कोटी रुपये मंजूर करण्यात आले.
या योजनेची जबाबदारी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे असल्याने जलयुक्त शिवार योजनेच्या सिमेंट नाला बंधारा योजनेसाठी आत्तापर्यंत काढलेल्या ईनिविदा प्रकियेतील ३ निविदेप्रकियेत शासन निर्णयाला बगल देत ६ पेक्षा अधिक व दुसèया तालुक्यातील कामांना क्लब करून निविदा काढल्याचा प्रकार उघडकीस आले.
सुरवातीला ६७ लाख ६९ हजार ६०९ रुपयाचे ६ कामाची निविदा काढली.यामध्ये अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १ व सडक अर्जुनी तालुक्यातील ५ कामे होती.या कामासाठी ९० लाखाच्यावर ज्या कंत्राटदाराचा परवाना आहे,तेच सहभागी होऊ शकते अशी अट होती.जेव्हा की एकत्रित कामाची किमंत ९० लाखाच्या आत आहे.४ एप्रिल रोजी ४ तालुक्यातील २९ सिमेट नाला बंधारा बांधकामासाठी २ कोटी ३४ लाख ३५ हजार ९२९ रुपयाच्या किमतीचे एकत्रित ईनिविदा आमंत्रित करण्यात आले.जेव्हा की शासन निर्णयानुसार एकाच तालुक्यातील ६ पेक्षा अधिक व ३ पेक्षा कमी कामाना क्लब करून ईनिविदा काढता येत नाही.या कामासाठी वर्ग ३ च्या कंत्राटदाराकडून निविदा आमqत्रत करण्यात आले. त्यात ज्यांचा परवाना ३ कोटीपेक्षा अधिक आहे तेच यात सहभागी होऊ शकतात.जेव्हा की काम हे अडीच कोटीच्या खाली आहे.या २९ बंधारा बांधकामाची निविदा काढताना शासन निर्णयाला बाजूला का सारण्यात आले अशा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गोरेगाव तालुक्यातील निंबा व चिल्हाटी आणि गोंदिया तालुक्यातील गंगाझरी व बलमाटोला या वेगवेगळ्या दोन तालुक्यातील कामांना क्लब करून ईटेंडर प्रकिया १३एप्रिल रोजी करण्यात आली.ही निविदा २० एप्रिलपर्यंत होणार असून २१ एप्रिलला टेंडर उघडण्यात येणार आहे.या ४ कामांची किमंत ४९ लाख ५२ हजार ६८१ एवढी आहे.८६ लाख ९८ हजार ६४६ रुपयाच्या ५ कामाची निविदा,५२ लाख ४२ हजार २७३ रुपयाच्या ५ कामाची निविदा ही स्वतंत्र काढण्यात आली ,ज्यात शासन निर्णयानुसार एकाच तालुक्यातील कामांना क्लब करण्यात आले.
जलयुक्त शिवार योजनेतील सर्व कामे ईटेंडरने करण्याचे निर्देश शासन निर्णयात आहे,परंतु र्इंटेडर करतांना एकाच तालुक्यातील ३ ते ६ कामे क्लब करून ई टेंडर करता येईल असे म्हटले आहे.त्यानुसार एकाच तालुक्यातील कामे क्लब करून र्इंटेडर करावयाचे आहे.पण गोंदियात याबाबीला डावलण्यात आले आहे.