सडक अर्जुनी तालुका काँग्रेसचे धरणे

0
18

सडक अर्जुनी : तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर १६एप्रिल रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार एन.जे. उईके यांच्यामार्फत अनेक मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.
या निवेदनामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या रबी पिकांच्या नुकसानीसाठी त्यांना प्रतिहेक्टरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, प्रतिक्विंटल धानाला २ हजार रुपये भाव देण्यात यावा व ५00 रुपये बोनस देण्यात याव्या, बियाने व रासायनिक खताच्या किमती कमी करण्यात याव्या, वनहक्क पट्ट्यांचे शासकीय रेट कार्ड दर्ज करावे, रोहयोची कामे प्रत्येक गावात चालू करावी, ओबीसी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यात यावी, सडक येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा, उपविभागीय कार्यालय लवकर सुरू करण्यात यावे, विद्युत पुरवठा खंडित होवू नये, सडक अर्जुनीला बसस्थानक बनविण्यात यावे, सडक अर्जुनी ते कोदामेडी बंधार्‍याचे काम त्वरित पूर्ण करावे अशा विविध मागण्यांचा समावेश होता.
या धरणे आंदोलनामध्ये तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मिताराम देशमुख, राजेश नंदागवळी, माजी सभापती अशोक लंजे, रामलालजी राऊत, शेषराव गिर्‍हेपुंजे, हिरालाल चव्हाण, जि.प. सदस्य जागेश्‍वर धनभाते, पं.स. सदस्य मधुसूदन दोनोडे, छायाताई चव्हाण, रमेश चुर्‍हे, प्रकाश मडावी, माया चौधरी, अनिल राजगिरे, सुखदास मेश्राम, पं.स. सदस्य निना राऊत, डॉ.श्रद्धा रामटेके, निशांत राऊत, बालचंद मोटघरे, अमृत बडोले, वैशाली मडावी, रेहान आरिफ शेख, रत्नदीप फुलूके, सुधाकर कुर्वे आणि मोठय़ा संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.