अति.मुकाअ पाडवी गेले रजेवर

0
9

अति.मुकाअ पाडवी गेले रजेवर
गोंदिया-जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी हे १३ एप्रिलपासून एक महिन्याच्या वैद्यकीय रजेवर गेले आहेत.गेल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या झालेल्या स्थायी समितीच्या सभेत पाडवी यांच्यावर पदाधिकारी व सदस्यांनी अविश्वास व्यक्त करीत त्यांना परत पाठविण्याचा ठराव घेतला होता.त्यानंतर परत उद्या (ता.१७) होणाèया विशेष स्थायी समितीच्या सभेत पाडवी यांना लपा विभागाच्या बंधारे प्रकरणाला सामोरे जावे लागले असते.त्या आधीच त्यांनी वैद्यकीय रजेवर जाण्याचा निर्णय घेतल्याने १३ एप्रिलपूर्वी त्यांच्या स्वाक्षरीसाठी त्यांच्याकडे गेलेले अनेक प्रकरण आता पडून राहणार आहेत.

समाजकल्याण अधिकारी पेंदाम तीन बैठकांना गैरहजर
गोंदिया-जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम हे समाजकल्याण विषय समितीच्या तीन बैठकींना सतत गैरहजर राहिले आहेत.पेंदाम यांच्या गैरहजेरीमुळे अनेक विकासकामांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळू शकली नसल्याची खंत समाजकल्याण सभापती कुसन घासले यांनी व्यक्त केली आहे.तसेच दोन वर्षात समाजकल्याण विभागाच्या निधीच्या खर्चाचे नियोजन करावयाचे असते ते सुध्दा होऊ शकले नसल्याचे सांगितले.पेंदाम तीन बैठकांना गैरहजर असतानाही त्यांच्या गैरहजेरीबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली,मात्र त्यांच्यावर कारवाईसंदर्भातला कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही.

पुराम झाले तीनविभागाचे प्रमुख
गोंदिया-गोंदिया जिल्ह्यात आधीच अधिकारी यायला तयार नसतात,त्यातच रिक्त असलेली पदे भरण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने गोंदिया जिल्हापरिषदेत अद्यापही महत्वाच्या विभागप्रमुखांची पदे रिक्त पडली आहेत.त्यातच सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम यांच्याकडे पुन्हा दोन विभागाचा कार्यभार सोपविण्यात आल्याने ते तीन विभागाचे प्रमुख झाले आहेत.
पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राठोड हे सेवानिवृत्त झाले तेव्हापासून हे पद रिक्त आहे.तेव्हापासून त्या पदाचा प्रभार पुराम यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.त्यातच आता अतिरिक्त मुकाअ जयवंत पाडवी हे वैद्यकीय रजेवर गेल्याने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभार सुध्दा पुराम यांच्याकडेच सीईओ दिलीप गावडे यांनी सोपविला आहे.