उमरेडचे भाजप आमदार सुधीर पारवे यांना दोन वर्षांची शिक्षा

0
13

नागपूर–उमरेडचे भाजपचे आमदार सुधीर पारवे यांना शुक्रवारी न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली. २००८ मध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य असताना त्यांनी एका शिक्षणसेवकाला मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. याच प्रकरणात भीवापूर न्यायालयाने त्यांना दोषी ठरवित दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. गेल्या दोन वर्षांपासून न्यायालयामध्ये या प्रकरणी सुनावणी सुरू होती. त्यावर शुक्रवारी निकाल देण्यात आला.