कोटमी जंगलात पोलिस-नक्षल चकमक

0
14

गडचिरोली, दि.८: एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम परिसरातील कोटमी पोलिस ठाण्याच्या हद़दीत आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. यावेळी पोलिसांनी नक्षल साहित्य जप्त केल्याचे वृत्त आहे.
जिल्हा पोलिस कोटमी जंगलात नक्षलशोध मोहीम राबवीत असताना नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देताच नक्षली जंगलात पसार झाले. चकमकीत कोणतीही हानी झाली नाही. मात्र पोलिसांनी घटनास्थळावरुन क्लेमोर माईन्स, वायर बंडल व अन्य साहित्य जप्त केल्याचे समजते.