तामिळनाडूचे मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांचा राजीनामा

0
29

चेन्नई, दि. २२ – तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत जयललिता यांच्यासाठी मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा करून दिला आहे. पन्नीरसेल्वम यांनी आज सकाळी राज्यपाल के. रोसय्या यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला.
बेहिशेबी मालमत्ता जमवल्याच्या गुन्ह्यातून कर्नाटक उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्याने अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता या पुन्हा तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचे संकेत मिळत होते. न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. गेल्या आठवड्यात न्यायालयाने बंगळुरुमध्ये ‘अम्मां’च्या बाजूने निकाल दिल्याचे जाहीर होताच अण्णा द्रमुकच्या असंख्य कार्यकर्त्यांनी तमिळनाडूत विजयोत्सव सुरू केला होता. आठ महिन्यांपूर्वी जयललिता यांच्या राजीनाम्यानंतर राज्य प्रशासनास आलेली मरगळ दूर होऊन तमिळनाडूच्या राजकारणास आता नवी कलाटणी मिळेल, असे मानले जात आहे.