‘गंगाबाईत’ जागतिक स्तनपान सप्ताह

0
16

गोंदिया दि. ७: : राष्ट्रीय आरोग्य अभियान व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते ७ ऑगस्टदरम्यान सुरू असलेल्या जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त बाई गंगाबाई महिला रूग्णालयात जनजागृती कार्यक्रम पार पडले. उद््घाटन नगरसेविका भावना कदम यांच्या हस्ते वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजीव दोडके यांच्या अध्यक्षतेखाली झाले. अतिथी म्हणून डॉ. अमरिश मोहबे, डॉ. वट्टी, डॉ. धाबेकर, डॉ. चव्हाण, डॉ. सुवर्णा हुबेकर, मेट्रन सिस्टर मेश्राम, सुखदेवे आदी उपस्थित होते. याप्रसंगी भावना कदम यांनी, आईचे दूध बाळासाठी अमृत आहे. पहिले सहा महिने आईने बाळाला निव्वळ स्तनपानच द्यावे. सुदृध बालके हीच देशाची खरी संपत्ती आहे, असे आवाहन केले. डॉ. हुबेकर यांनी, यावर्षी जागतिक स्तनपान सप्ताहाचे घोषवाक्य ‘ब्रेस्ट फिडींग अँड वर्क-लेट अस मेक इट वर्क’ असे आहे. नोकरी, व्यवसाय करणार्‍या आजच्या स्त्रिला आपल्या बाळाला योग्य प्रमाणात स्तनपान करता यावे यासाठी कौटुंबीक, सामाजिक व कार्यालयीन पातळीवर सहकार्य मिळणाची गरज आहे. त्यासाठी सप्ताहाच्या निमित्ताने ‘मदर्स फ्रेंडली वर्क प्लेसेस’ (माता संगोपनसहीत कार्यालये) ही संकल्पना पुढे येत असल्याचे सांगितले. मेट्रन मेश्राम यांनी, चीक दुधातून नवजात बाळाला प्रतिजैविके मिळतात. सुरूवातीचे तीन दिवस बाळाला ‘कोलोस्ट्रम’ युक्त स्तनपान अवश्य द्यावे, हेच बाळाचे पहिले लसीकरण असल्याचे सांगितले. तर डॉ. संजीव दोडके यांनी गंगाबाई रूग्णालयात ह्युमन ब्रेस्ट मिल्क बँक सुरू होईल, असे सांगितले.