हाथरस घटनेचा ओबीसी सघंर्ष समिती महिला आघाडीने नोंदवला निषेध

0
299

सडक अर्जुनी,दि.01ः- उत्तर प्रदेशातील हाथरस याठिकाणी मनीषा वाल्मीकि या मागासवर्गीय तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराने मुळे पीडित मुलीचे निधन झाले.या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणाचा निषेध नोंदवत आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी व सदर प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावे या मागणीचे निवेदन ओबीसी संघर्ष कृती समिती महिला आघाडीच्यावतीने सडक-अर्जुनी तहसीलदार यांच्या मार्फेत प्रधानमंत्र्यांना पाठविण्यात आले.निवेदन देतेवेळी ओबीसी संघर्ष कृती समिती महिला आघाडी अध्यक्ष पुष्पाताई खोटेले,जिल्हा उपाध्यक्ष छायाताई चव्हाण,सडक अर्जुनी तालुका महिला अध्यक्ष किरण पांडुरंग हटवार,कल्पना गौर,तालुका कार्याध्यक्ष रंजनाताई भोई,प्रिती राजगिरे,भाग्यश्री संदीप भोंडवे,सरिता हनुमानप्रसाद पटले,धनवंता नंदकिशोर गभणे, जिजाबाई जागेवर पटोले, माधुरी यावलकर,दिनेश हुकरे,विलास कापगते,सुधाकर कुर्वे,रेखा शहारे,स्वाती शहारे,वैशाली हत्तीमारे,वर्षा शहारे,रंजिता मेश्राम,प्रिया बडोले,धनवंता गभणे,कविता चौधरी,नलिना कोटागंले,लिना राऊत,सरिता तरोणे आदिंचा समावेश होता.