आरोग्य व शिक्षण कटरेकंडे तर अर्थ बांधकाम श्रीमती गहाणेकडे!

0
11

गोंदिया दि. ११: जिल्हा परिषदेच्या नविनियुक्त सदस्यांची पहिली सर्वसाधारण सभा आज मंगळवारला होत आहे.यात विविध खाते वाटप करण्यात येणार आहे.त्यासाठी रात्री उशीरापर्यंत जि.प.अध्यक्ष श्रीमती मेंढे यांच्या कक्षात काँग्रेस सदस्यांची बैठक चालली.कुठल्या विषय समितीवर कुठले सदस्य घ्यायचे सोबत सभापतींच्या विषय समितीसंदर्भात चर्चा झाली.यामध्ये आमदार अग्रवाल यांचे लक्ष आरोग्य व शिक्षण विभागाकडे असल्याने पी.जी.कटरे यांच्याकडे आरोग्य व शिक्षण समितीचे सभापतीपद मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.सोबतच उपाध्यक्ष रचना गहाणे यांना अर्थ व बांधकाम समिती मिळण्याची शक्यता आहे.छाया दसरे यांना कृषी व पंशुसवधर्न समितीचे सभापती निश्चित झाले आहे.जिल्हा परिषद अस्तित्वात आल्यानंतर उपाध्यक्षाकडे पहिल्यांदाचा अर्थ व बांधकाम समिती जाणार आहे.
जलसंधारण व स्थायी समिती हे पदसिद्ध खाते अध्यक्षांकडे येत असल्यामुळे हे खाते जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे यांच्याकडे आहे. यापूर्वी झालेल्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतिपदी काँग्रेसच्या विमल नागपूरे यांची तर समाज कल्याण समितीच्या सभापतिपदी भाजपचे वळगाये यांची वर्णी लागली होती. सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची स्थायी समितीमध्ये संख्या अधिक राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.