ग्रामसभेत रोहयोचा मंजूर बजेट ठेवा- मेंढे

0
9

गोंदिया दि. १५ : गरजू मजुरांना त्यांच्या गावातच काम मिळावे, यासाठी स्वातंत्र्यादिनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतने ग्रामसभेत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा सन २0१६-१७ या वर्षाचा मजुरांचा अर्थसंकल्प (लेबर बजेट) ठेवावा, असे आवाहन जि.प. अध्यक्ष उषाताई मेंढे यांनी केले आहे.
ग्रामविकास व जलसंधारण महिला व बालविकास रोजगार हमी योजना महाराष्ट्र शासनातर्फे १५ ऑगस्ट २0१५ रोजीच्या ग्रामसभेत राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे लेबर बजेर मंजूर करण्यासाठी ग्राम पंचायती सक्रिय सहभाग नोंदविणे आहे, असे पत्राद्वारे कळविले. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व ग्रामंपचायतीचे सरपंच, सदस्य, नागरिक व महिलांनी आपापल्या गावातील सर्व कामे गामसभेच्या नियोजनात ठेवून मजूरांसाठी हा बजेट महत्वाचा ठरणार असल्याचे ग्रामसभेत सदर बजेट ठेवण्याचे आवाहन जि.प. अध्यक्षा उषाताई मेंढे यांनी केले आहे.
योजनेचे लेबर बजेट तयार करताना लोकांचा सक्रिय सहभाग महत्वाचा आहे. लोकांच्या सक्रिय सहभागातून ग्रामीण भागाच्या आवश्यकतेप्रमाणे विकासाचा आराखडा तयार करण्यात मदत होणार आहे. ग्रामीण भागातील गरजू मजूरांना राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा लाभ घेण्यासाठी मदत होणार आहे. परिणामी गरजू मजुरांना त्यांच्याच गावात काम उपलब्ध होईल. म.गां. राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत कमीत कमी ५0 टक्के कामे ही ग्रामपंचायत मार्फत होणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.