सीईओंचे दुर्लक्ष…जि.प.बांधकाम विभाग कार्यकारी अभियंत्याविना

0
484

गोंदिया,दि.23ः-कुठल्याही विभागाचा विभागप्रमुख बदलून गेला,सेवानिवृत्त झाला की रजेवर जरी गेला तरी तीन दिवसापेक्षा अधिक काळ ते पद विना अधिकारी ठेवता येत नसल्याचे शासनाचे धोरण आहे.मात्र गोंदिया जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हे बदलून गेल्यानंतर त्या पदावर प्रभारी कार्यकारी अभियंता म्हणून गोंदियाचे उपविभागीय अभियंता यांना पदभार सोपविण्यात आला.मात्र कोरोना काळात त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांनी आपला पदभार सोडला.त्यानंतर लगेच त्या पदाचा पदभार सडक अर्जुनी येथील उपविभागीय अभियंता यांच्याकडे सोपविण्यात आले.मात्र त्यांनीही आजारामुळे रजा टाकली आणि रजेचा अर्ज टाकतांनाच कार्यकारी अभियंता पदाचा प्रभारातून मुक्त असल्याचेही पत्र दिले.ते रजेवर जाऊन चार पाच दिवसाचा काळ लोटला असला तरी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने सीईओंच्या लक्षात अद्यापही ही माहीती न आणून दिल्याने गेल्या चार पाच दिवसापासून कार्यकारी अभियंत्याविना बांधकाम विभागाचा कामकाज सुरु आहे.जेव्हा शासन नियमाप्रमाणे तीन दिवासापेक्षा अधिक काळ पद विना अधिकारी ठेवता येत नसल्याचे बांधकाम विभागातील सुत्रांचे म्हणने आहे.