वनविभागातर्फे होणार शासन निर्णयाचे नियमित वाचन

0
8

बैठकीपूर्वी एकत्रित वाचन करण्याच्या सूचना

गोंदिया, दि. २० : लोकाभिमूख आणि विकासात्मक प्रशासनाचा हेतू नजरेसमोर ठेवून जनतेच्या हिताच्या दृष्टीने शासनातर्फे महत्वपूर्ण योजना व कार्यक्रम या विषयी धोरणात्मक निर्णय घेतली जातात हे निर्णय जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहोचविण्यासाठी व योग्य अंमलबजावणी करण्यासाठी वनविभागाचे शासन निर्णय व परिपत्रके नियमित वाचन करण्याच्या सूचना वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. १९ ऑगस्ट २०१५ रोजी या संबंधीचा वनविभागाचे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहेत.
शासन निर्णयाच्या नियमित वाचनामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना योजनांची व कार्यक्रमाची विहीत कालमर्यादेत आणि अचूकपणे अंमलबजावणी करता येणे सोयीचे होणार आहे. त्यातून जनताभिमूख, पारदर्शी, संवेदनशील, उत्तरदायी, गतिमान आणि उत्तम प्रशासनाच्या दृष्टीने शासनाचे काम जनतेसमोर ठळकपणे येण्यास मदत होणार आहे. या शासन निर्णयाची चर्चा सोशल मिडीयावरही करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
वनविभागाच्या क्षेत्रीय स्तरावरील विभागप्रमुख, प्रादेशिक विभागप्रमुख, जिल्हा आणि उपविभागीय स्तरावरील प्रमुख यांच्या वेळोवेळी होणाऱ्या बैठकांपूर्वी वनविभागाचे शासन निर्णय व परिपत्रकाचे वाचन करण्यात यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शासन निर्णयातील संदर्भाचे बारकाईने वाचन करणे व निर्णयाचे तपशील समजून घेऊन विचाराचे आदान प्रदान करावे. तसेच अंमलबजावणी विषयक समस्या व अडचणी असल्यास त्याचे निराकरण करावे. असेही परिपत्रकात नमूद आहे.
वनविभागाअंतर्गत पाच प्रशिक्षण संस्था असून त्यामध्ये वनक्षेत्रपाल, वनपाल आणि वनरक्षक यांना पायाभूत प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणादरम्यान शासन निर्णय व परिपत्रक या संदर्भातील वाचन कशारितीने करावे, तपशील कसा समजून घ्यावा याबाबतचा समावेश प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमात करण्यात यावा असे परिपत्रकात नमूद आहे. वनविभागाचे अनेक अधिकारी व कर्मचारी सोशल मिडीयाद्वारे एकमेकांशी विचारांची देवाण घेवाण करीत असतात. वनविभागांतर्गत असे अनेक गट कार्यरत आहेत. या ग्रूपवर देखील शासन निर्णय आणि वनविभागाच्या इतर महत्वाच्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करावी. त्यामुळे या क्षेत्रातील त्रृटी आणि बारकावे नजरेस येतील व त्यातून सुधारणांना अधिक वाव मिळेल असे परिपत्रकात सूचविण्यात आले आहे.
वनविभागाअंतर्गत निर्गमित करण्यात येणारे शासन निर्णय,अधिनियम व परिपत्रके शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली जातात. सदर शासन निर्णय वनविभागाच्या ुुु.ारहरषेीशीीं.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर देखील अपलोड करण्यात यावेत. त्यामुळे वन, वन्यप्राणी, जैवविविधता यांचे रक्षण, संवर्धन, विकास आणि व्यवस्थापन, वनक्षेत्र व वृक्षाच्छादन वाढविणे इत्यादीविषयी आवड, रुची आणि जागरुकता असलेल्या लोकांना यासंदर्भात माहिती जलदगतीने मिळविता येईल. हा यामागचा उद्देश आहे.