पानसरे आणि दाभोलकर यांना कम्युनिस्ट पक्षाने वाहिली श्रद्धांजली

0
9

गोंदिया,दि.२० :कॉमरेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला आज ६ महिने पूर्ण झाली असून नरेंद्र दाभोलकर यांच्या ही हत्येला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. तरीही त्यांचे मारेकरी अजून मोकाटच आहेत. या बाबीचा निषेध करण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.तसेच त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. या मोर्च्यात शेतक-यांच्या ही विविध मागण्यांच्या समावेश होता. मोर्च्याचे नेतृत्व हौसलाल रहागंडाले,मिलिंद गणवीर यांनी केले.
भूमीहीन शेतकरी, आदिवासी, गैर आदिवासी यांना जमिनीचे हक्क व राजस्व जीमिनीचे पट्टे देण्यात यावे, ५५ वर्षा वरील शेतमजुराला ३००० हजार रुपये पेंशन देण्यात यावी, घरकुल बांधण्याकरिता तीन लाख रुपये मदत देण्यात यावी, शेतीची कामे रोजगार हमी अंतर्गत करण्यात यावे आदी विविध मागण्यांचा समावेश होता. या आंदोलनात शेकडो कम्युनिस्ट कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते.मोच्यार्नंतरी निवासी उपजिल्हाधिकीरी यांना मुख्यमंत्र्याच्या नावे निवेदन सादर करण्यात आले.