दाभोलकरांच्या मारेकर्यांच्या शोध घ्या;अंनिसचे धरणे

0
17

भंडारा दि.२२: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष व अग्रणी समाजसुधारक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेला दोन वर्षे होऊनही त्यांचे मारेकरी अद्याप सापडलेल्े नाहीत. त्यातच कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या खुनाला सहा महिने पूर्णहोऊन त्याचाही तपास लागलेला नाही. डॉ. दाभोलकर, पानसरे यांच्या खूनाचा त्वरीत तपास करून मारेकर्‍यांना व या घटनेमागील सूत्रधारांना अटक करण्यात यावी, यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देऊन निषेध नोंदविण्यात आला.
उद््घाटन सामाजिक कार्यकर्ता ईश्‍वरदयाल काबरा यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र अंनिसचे जिल्हाध्यक्ष हर्षल मेश्राम हे होते. याप्रसंगी अंनिस राज्य सरचिटणीस प्रा. नरेश आंबिलकर, नगरसेवक हिवराज उके, बळीराम सार्वे, प्रा. वामनराव तुरिले, एस.के. भादुडी, शरयू डहाट, सदानंद इलमे, पुरण लोणारे, भगिरथ धोटे, विजया पाटील, अजय वासनिक, अशोक बागडे, अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णूदास लोणारे, अश्‍विनी भिवगडे, उर्मिला आगाशे, डॉ. महेंद्र गणवीर, चांगेश्‍वर मांढरे, विलास केजरकर, वामनराव चांदेवार उपस्थित होते. शासनाने या खुनाचा अद्याप तपास न लावल्याने शासनाचा निषेध करण्यात आला. डॉ. नरेंद्र दाभोलकर, अँड. गोविंदराव पानसरे यांच्या खुनाचा तपास त्वरीत करून या घटनेमागे असलेल्या सूत्रधारांना अटक करण्यात यावी, या मागण्यांचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. तसेच राष्ट्रपती भारत सरकार यांच्या नावाने डॉ. नरेंद्र दाभोलकर हे हत्यारे कब पकडे जाऐंगे, असे शेकडो पोष्ट कार्ड लिहून सोडण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी मेहमुद अली, बासप्पा फाये, गणेश कार, नरहरी नागलवाडे, कविता लोणारे, त्रिवेणी वासनिक, सुजाता घोडीचोर, शोभा कनोजे, रत्नमाला वासनिक, गिता गजभिये, अनंत कावळे, बिंदू रामटेके, बाया बनकर, मंजू वासनिक, रॉयल लोणारे, देवा सेब्रे, शैलेश खेडीकर, सॉयल लोणारे, रमेश मस्के यांनी परिश्रम घेतले. संचालन प्रा. नरेश आंबिलकर तर आभार विष्णुदास लोणारे यांनी मानले.