ओबीसींनी रणांगणात उतरणे अत्यंत गरजेचे-अ‍ॅड.धनराज वंजारी

0
151

नागपूर,दि.११: सध्या देशासह राज्यातही विविध समस्या कायम असून त्या सोडविण्याकरिता केंद्र व राज्य सरकार फारसे प्रयत्न करत असताना दिसत नाही. गेल्या कित्येक वर्षापासून ओबीसींची जात निहाय जनगणना रखडली आहे. ती जनगणना शासनाने तात्काळ करावी. तसेच दुदैवाने प्रबळ मराठा समाज ओबीसीमध्ये आरक्षणाच्या मागणीकरिता सर्व शक्तीनिशी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे राज्यातील समस्त ओबीसी, वीजेएनटी, बारा बलुतेदार समाज आस्वस्थ असून गेली २ वर्ष न्यायाची लढाई वेगवेगळ्या टप्यावर लढत आहे. ओबीसी समाजाने आपल्या संविधानिक न्याय हक्कासाठी रणांगणात उतरल्या शिवाय त्यांना आपले हक्क मिळवता येणार नाही. असे प्रखर मत वंचित बहूजन आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अ‍ॅड. धनराज वंजारी यांनी व्यक्त केले.
भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संगठना द्वारा ओबीसी रणांगण परिषद रविवार (दि.१)ला नागपूर येथेील महाराष्ट्रर् प्रदेश कार्यालयता पार पडली. त्याप्रसंगी अ‍ॅड. धनराज वंजारी यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून वरील मत मांडले. कार्यक्रामाचे अध्यक्ष म्हणून मा.डॉ. ज्ञानेश्वर गोरे, प्रदेशाध्यक्ष बीपीएसएस महाराष्ट्र यांनी स्थान भूषविले. व सभेला मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उद्घाटक कृष्णाजी बेले, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांनी सभेला मार्गदर्शन केले. प्रास्ताविकेच्या माध्यमातून प्रा.अ‍ॅड. रमेश पिसे यांनी परिषदेच्या आयोजनाची गरज व पुढील कार्यक्रम यावर प्रकाश टाकला. अ‍ॅड. अंजली साबळे, विलास काळे, सुनिता काळे, वंदना बनकर, माजी खासदार खुृशाल बोपचे, खेमेंद्र कटरे, बी.के. हेडाऊ, संजय हेडाऊ, संजय शेंडे, शुभांगी घाटोळे, विनायक वाघ, शकील अहमद, प्रा. शरद वानखेडे, उमेश कोराम, अ‍ॅड. रामकृष्ण सांभारे, सुषमा भड, सरफरात भाई यांनीही ओबीसींच्या विविध समस्यांवर प्रकाश टाकला. ओबीसी, एससी, एसटी व अल्पसंख्याक समाज यांच्या न्याय मागण्या त्वरित मान्य न केल्यास आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा याप्रसंगी शासनकत्र्यांना देण्यात आला.
१० नोव्हेंबर रोजी मुंबई येथे ओबीसी गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पुढील दिशा ठरवविण्यात आल्या. २६ नोव्हेंबरला संविधान दिनानिमित्त ओबीसींचा जागर पुकारण्यात आला आहे. तसेच ७ डिसेंबर २०२० रोजी नागपूर येथे सुरु होणाèया महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशनाच्या वेळी विधान सभेला घेराव करण्याचा निर्धार परिषदेत व्यक्त करण्यात आला. संचालन विलास काळे यांनी केले. आभार लक्ष्मीकांत लोळगे यांनी मानले.
यावेळी अ‍ॅड. अनिल बांगळकर, राठोड, डॉ. विजय चाफले,एस.यु.वंजारी, मनोज चव्हाण, वामनराव नखाते, मोहबे, विलास शेंडे, कैलास डफ, वसंता शेंखवरे, संजय शेंडे, प्रा. नितीन पडोळे, माधुरी सेलोकर, हरीकिशन दादा हटवार, पुरुषोत्तम कामडी, फुलसर सतीबावणे, भास्कर पाटील, विजय दुररतकर, दिनकराव वाढोरे, श्याम पाटमासे, प्रेम महेशकर, सुनील लोखंडे आदि उपस्थित होते.