खा.पटोलेंच्या बैठकीला अधिकाèयांचा ठेंगा

0
9

अधिकाèयांच्या अनुपस्थितीवर जिल्हाधिकारी गप्प

गोंदिया दि. २८-येथील जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्र सरकारच्यावतीने राबविण्यात येणाèया योजनांचा आढावा घेण्यासाठी गोंदिया जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे पदसिद्द अध्यक्ष असलेले खासदार नाना पटोले यांनी आज शुक्रवारला बैठक बोलावली होती.या बैठकीचे पदसिद्ध सचिव हे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी होते.विशेष म्हणजे ही बैठक पूर्वनियोजित असतानाही जिल्हा परिषदेचे व राज्यसरकारच्या यंत्रणेच्या पन्नास टक्के विभाग प्रमुख असलेल्या अधिकाèयांनी ठेंगा दाखविला.बैठकीला बहुतांश अधिकारी अनुपस्थित राहिल्याने खा.पटोले चांगलेच रागावले.जिल्हाधिकाèयांना बैठकीला अनुपस्थित अधिकाèयांवर कारवाई करण्याची सूचना केली.तसेही या बैठकीला उपस्थित जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्याकडे बघितल्यावर ते सुध्दा या बैठकीसाठी पाहिजे तसे उत्साहित दिसून आले नाही.यापूर्वी झालेल्या बैठकीकडे बघता अधिकारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या बैठकीबाबत अनुत्साही दिसून येत होते.बहुतांश विभागाच्या अधिकाèयांनी तर माहितीचे टिपणही व्यवस्थित आणले नसल्याचे दिसून आले.
या बैठकीची वेळ सकाळी ११ वाजताची असतानाही सार्वजनिक बांधकाम(रोहयो)कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण,जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता शेख,भारतीय दूरसंचार विभागाचे राजेशकुमार,लीड बँकेचे प्रमुख,रेल्वेचे अधिकारी,स्थानिक स्तर लघू पाटबंधारे,जिल्हा परिषद लघू पाटबंधारे,मध्यम पाटबंधारे,बाघ इटियाडोह विभागाचे कार्यकारी अभियंता या बैठकीला गैरहजर होते.विशेष म्हणजे जिल्हा कृषी अधीक्षक कुरील यांनीही दांडी मारत आपल्या अधिनस्थ अधिकाèयाला पाठविले होते.तहसील कार्यालयाच्या माध्यमातून योजना राबविण्यात येत असताना तहसीलदारांना सुध्दा निमंत्रित करण्यात आले नव्हते.या सर्व प्रकारावरून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीचे सचिव असलेले जिल्हाधिकाèयांनीच कडक भूमिका न घेतल्याने बहुतांश अधिकारी अनुपस्थित राहिले.त्यातही भारतीय जनता पक्षाचे खासदार नाना पटोले असले तरी त्यांचे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले राजकुमार बडोले यांच्याशी आजच्या घडीला पाहिजे तसे पटत नसल्यानेच बहुतांश भाजपमधील आंतरिक घुसफूसीचा लाभ अधिकारी बैठकीसाठी घेत तर नसावे ना अशाही चर्चा होत्या