शाळेच्या आवारभिंतीच्या नावाआड पत्रकाराच्या घराचा वहिवाटी रस्ता अडविला

0
27

ग्राम सभेच्या निर्णयाला मुख्याध्यापकाने दाखविली केरीची टोपली
कार्यकारी अभियंत्याचे काम बंदचे आदेश पाळले जात नाही
पोलिसातही तक्रार

गोंदिया दि.29- देवरी तालुक्यातील मुल्ला येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारqभतबांधकामाआड एका वृत्तपत्राच्या पत्रकाराच्या राहत्या घराचा व त्याच्या राइसमीलचा सुमारे ५० वर्षापासूनचा वहिवाटी रस्ता अडविण्याचा प्रकार सुरू आहे. या प्रकरणी प्रशासनाला व पोलिसांना कळवूनही कारवाई मात्र शून्य असल्याने त्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली आहे. उल्लेखनीय म्हणजे जि.प.च्या कार्यकारी अभियंत्यांनी मौका चौकशी करून काम बंद करण्याचे लेखी आदेशही दिले आहे. तर ग्रामसभेने पर्यायी रस्ता जोपर्यंत ग्रामपंचायत तयार करून देत नाही, तो पर्यंत अस्तित्वातील विहवाटी रस्ता अडविला जाणार नाही, असे अन्यायग्रस्ताला लेखी कळविले आहे.
सविस्तर असे की, सुरेश भदाडे हे पत्रकार असून त्यांचे मुल्ला येथे सुमारे ५० वर्षापासून राहते घर व राइस मिलचा धंदा आहे. या राईसमीलवर मुल्ला या गावासह परिसरातील वडेगाव, लोहारा, पुराडा, मुरपार, ठिवरीणटोला,मोहनटोला, सावली, पंढरपूर, चांदलमेटा, ओवारा, चारभाटा, सुरतोली, सुब्रायटोला, सालेगाव आदी गावातून शेतकरी आपले धान पिसाईसाठी बैलबंडीसह इतर वाहनाने येतात. भदाडे यांचेसह त्यांच्या मीलवर येणाèया शेतकèयांची वहिवाट ही गेल्या ५० वर्षापासून बिनारोकटोक पूर्वेकडील आबादी जागेतून आहे व तसे गावनकाशातही नोंद आहे.
श्री. भदाडे यांच्या घराच्या पूर्वेला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून शाळेच्या मालकीची ०.०३ हे.आर. जागा आहे. राईसमील आणि शाळेच्या मालकीच्या मध्ये आबादी जागा आहे. शाळा व भदाडे यांचे वास्तव्य हे फारपूर्वी पासून कोणत्याही त्रासाविना अविरत आजपर्यंत सुरू होते. शाळेला पूर्वीची लोखंडी गेटसह सुरक्षाभिंत असताना सर्व शिक्षा अभियान योजनेतून पुन्हा दुसरी आवारभत बांधकामासाठी १० लाख रुपयाचा निधी शाळा व्यवस्थापण समितीला मिळाला. याचा फायदा घेत जि.प शाळेचे मुख्याध्यापक व काही पदाधिकारी यांनी निधीची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने आबादी जागा व इतरांच्या खासगी जागेतून आवारभितींचे बांधकाम गेल्या मे महिन्यात सुरू केले. अन्यायग्रस्ताने आपली वहिवाट बंद होण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने कार्यकारी अभियंता व इतरांना कळविले. यामुळे १३ मे रोजी कार्यकारी अभियंता जिवनेश मिश्रा यांची मौका चौकशी करून १४ मे २०१५ ला लेखी कामबंद आदेश दिला. परंतु, अध्यक्ष व मुख्याध्यापकाने स्थगनादेश झुगारून काम सुरू ठेवले. या प्रकरणाची माहिती कार्यकारी अभियंत्यांनी ग्रामपंचायतीला दिली. यावरून ३० मे २०१५ च्या तहकूब ग्रामसभेत हा विषय चर्चेला आला. त्यावेळी सभेत उपस्थित ग्रामस्थाने एकमताने रस्ता बंद करू नका, त्यामुळे भदाडे यांच्या एकट्याचा प्रश्न नसून गावपरिसरातील शेतकèयांच्याही वहिवाटीचा प्रश्न असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यामुळे ग्रामसभेने भदाडे यांच्या राइसमील व घराकडे जाणारा नवीन पर्यायी रस्ता तयार झाल्याशिवाय त्यांचा वहिवाटी रस्ता बंद करू नये, असे सुचविले. पर्यायी रस्ता हा भदाडे यांच्या घरासमोरील अंगणवाडीच्या मागच्या भागातून ग्रामपंचायत करून देईल. त्यानंतरच जुना रस्ता बंद करता येईल, असा एकमुखी निर्णय घेतला. उल्लेखनीय म्हणजे या प्रकरणी भदाडे यांनी देवरी पोलिसातही तक्रार दिली आहे. ग्रामसभेच्या निर्णयानंतर मुख्याध्यापक व अध्यक्षाने काम सुरू केले व भदाडे यांचा रस्ता कायम ठेवला. सर्वशिक्षा अभियान योजनेतून शाळेला सुरक्षाqभत तयार करायची असूनही मुख्याध्यापक व अध्यक्षाने भदाडे यांचा वचपा काढण्याच्या उद्देशाने भदाडे यांच्या घराशेजारी असलेल्या अंगणवाडीला कंपाउंड करण्याचा षडयंत्र रचल्याचे सांगितले जाते. असे असताना अचानक २३ ऑगस्ट रोजी अध्यक्ष भास्कर भुते यांना देवरी पोलिसात भदाडे विरुद्ध अडथळा करीत असल्याची खोटी तक्रार दाखल केली. व दुसèयाच दिवसी त्यांच्या रस्त्यावर खड्डे खोदून काम सुरू केले. याची तक्रार भदाडे यांनी देवरी पोलिस, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, कार्यकारी अभियंता व मुख्यकार्यपालन अधिकारी यांना केली. मात्र, त्या तक्रारीवर काय कारवाई झाली, हे अद्यापही कळू शकले नाही. प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन भदाडे यांना न्याय देण्याची मागणी केली असून ग्रामसभेच्या निर्णयाचा अनादर करणाèयांवर कडक कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.