अस्वल हल्यातील जखमी महिलेच्या कुटुंबीयांना १ लाखाची मदत

0
66

नवेगावबांध,दि. २९- येथून जवळच असलेल्या देवलगाव येथील कविता महेश चांदेवार या महिलेवर १४ ऑगस्टच्या सकाळी अस्वलाने हल्ला करून जखमी केले होते.सदर महिला दररोजप्रमाणे आपल्या शेताकडे गेली असता अस्वलाने तिच्यावर मागून हल्ला करून जखमी केले होते. महिलेच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात जखमा केल्याने ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे दाखल करण्यात आले होते.महिलेची प्रकृती अतिशय गंभीर झाल्यावर नागपूर येथील सोरटेक रुग्णालयात दाखल करण्यात आले. वन्यजीव विभागाने अस्वलाच्या हल्यात जखमी झालेल्या महिलेला योग्य उपचार मिळावा याकरिता तत्परता दाखवीत सदर महिलेला १ लाखाचा धनादेश जि.प. सदस्य किशोर तरोणे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
यावेळी क्षेत्र सहायक आर.बी. धोटे, क्षेत्रसहाय्यक नवेगावबांध डी.बी. सोनवाने, लिलेश खुने, सोमलकर, दिलीप देशमुख, महेश चांदेवार, भोयर आदी उपस्थित होते. पुढील मदत लवकरच उपलब्ध करून देऊ असे आश्वासन विजय महादेव मेहर यांनी दिले आहे.