महाराजस्व अभियानांतर्गत महागावात शिबिर संपन्न

0
13

सतिश कोसरकर
अर्जुनी मोरगाव,दि.१-महसूल प्रशासन गतिमान चालविण्याकरिता तथा शासनाचे विविध योजनेचा सामान्य नागरिकांना लाभ मिळावे या उद्दिष्टाने २९ ऑगस्ट रोजी तालुक्यातील महागाव येथे महाराजस्व अभियान अंतर्गत विस्तारीन समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचा लाभ अनेक नागरिकांना मिळाला असून अशा शिबिराबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन पं.स.सभापती अरqवद शिवणकर यांनी केले. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी होते. जि.प. उपाध्यक्षा रचना गहाणे, माजी आ. दयाराम कापगते, उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव, तहसीलदार कल्याणकुमार डहाट उपस्थित होते. प्रास्ताविकात तहसीलदार डहाट यांनी शासनाच्या विविध योजनाविषयी माहिती दिली. या शिबिरात तालुक्यातील सर्वच विभागाअंतर्गत विविध योजनांच्या माहितीच्या संदर्भात स्टॉल लावण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी व इतर पाहुण्यांनी लावण्यात आलेल्या स्टॉलची पाहणी केली. जिल्हाधिकारी यांनी विविध योजनांची माहिती देतांना या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. दरम्यान जि.प. उपाध्यक्षा गहाणे, माजी आ. दयाराम कापगते यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी विज पडून मृत्यू झालेले खामखुरा येथील प्रभुदास मेश्राम यांच्या पत्नी सुमित्रा मेश्राम यांना महसूल विभागातर्फे शासनाकडून देण्यात येणाèया मदत निधीच्या ४ लाख रुपयांचे धनादेश जिल्हाधिकाèयाच्या हस्ते देण्यात आले.संचालन शामाप्रसाद हायस्कूलचे प्राध्यापक श्री भावे यांनी केले. तर आभार गटविकास अधिकारी ना.रा. जमईवार यांनी मानले.