अर्जुनी मोर बाजार समिती सभापती-उपसभातीची निवड बुधवारला

0
17

अर्जुनी मोरगाव,दि.१ -येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या संचालकांच्या निवडणुकीनंतर आता उद्या बुधवारी (ता.२) होऊ घातलेल्या सभापती व उपसभापतीच्या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध गटातून १९ संचालक निवडायचे होते. या निवडणुकीत भाजपाने किसान आघाडीतर्फे तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व पटकदल यांनी परिवर्तन पॅनलतर्फे आपले उमेदवार रिंगणात उतरविले होते.भाजपसमर्पित किसान विकास आघाडीचे १६ संचालक निवडून आले. तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस समर्पित परिवर्तन पॅनलला ३ जागावर समाधान मानावे लागले. भाजपाची एक हाती सत्ता आल्याने सभापती, उपसभापती कोन या चर्चांना उधाण आले आहे. सभापती पदासाठी विद्यमान सभापती काशीम जमा कुरैशी यांच्यासोबतच,विद्यमान उपसभापती प्रमोद लांजेवार, लायकराम भेंडारकर, प्रदीप मस्के यांच्याही नावाची चर्चा आहे. उपसभापतीसाठी प्रमोद लांजेवार, लायकराम भेंडारकर, प्रदीप मस्के qकवा व्यंकट खोब्रागडे यापैकी एकाची वर्णी लागू शकते, अशाची चर्चा आहे.