पुस्तकाच्या सान्निध्यातून माणूस होण्याची प्रेरणा मिळते- कदम

0
13

एकोडी : ज्या-ज्या लोकांनी पुस्तकाच्या सान्निध्यात राहून वाचन केले,त्यांनी आपल्या समाजाचा व देशाचा मानसन्मान वाढवला. अनेक असे महान व्यक्ती होऊन गेले ज्याच्याकडे धड खाण्याचे व राहण्याचे साधन नव्हते.परंतु वाचनाची आवड, त्यांच्या वाचनाच्या छंदामुळे आपली व इतरांची प्रगती केली. पुस्तकांच्या सान्निध्यातून चांगला माणूस बनण्याची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक कदम यांनी केले.
प्रयास मित्र मंडळ गंगाझरीच्या सहकार्याने नवीन वाचनालय सुरू करण्यात आले. याप्रसंगी जि.प.क्षेत्राचे सदस्य रमेश अंबुले यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले वाचनालय समिती येथे वाचनालयाचे उद््घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी गंगाझरीचे ठाणेदार पोलीस निरीक्षक दीपक कदम होते.अतिथी म्हणून पी.जी. बंसोड, पं.स. सदस्य प्रकाश पटले, सरपंच ममता लिल्हारे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. कदम म्हणाले, वाचनातून चांगल्या-वाईट गोष्टी लक्षात येतात. त्यांचे चांगल्या प्रकारे अनुकरण केल्यास चांगला माणूस निर्माण होण्याची प्रेरणा मिळते. आजच्या परिस्थितीत अनेक प्रकारचे गुन्हे घडत असतात. परंतु यासाठी वापरण्यात येणारे साधन म्हणजे मोबाईल. त्यामुळे अनेक लोक गुन्हेगारीत सापडत आहे. त्यामुळे सर्वांनी याचा योग्यप्रकारे वापर न केल्यास अनावधनाने कोणताही व्यक्ती अडकू शकतो.त्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्त सजग राहण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
याप्रसंगी क्रांतिज्योती सावित्री फुले वाचनालय समितीकडून कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यात आले. संचालन सोन घरडे व आभार लोकेश नागभिरे यांनी मानले.कार्यक्रमासाठी साजीद शेख, लोकेश नागभिरे, सोनू घरडे, राकेश मरस्कोल्हे, टिकेंद्र कटरे, प्रदीप फेंडर, अबेर अग्रवाल, सुधाकर वलके, संदीप मरस्कोल्हे, अविनाश फुले, धमेंद्र उईके, विशाल उके, लक्ष्मण कोडबानी, संदीप सिंघाडे, धर्मदीप फेंडर, महेंद्र बोरकर, रोहीत घरडे, प्रीतम येरणे यांनी सहकार्य केले.