पायाभूत सर्वेक्षणाचे काम वेळेत करा :पुराम यांचे आवाहन

0
14

गोंदिया दि.3: शौचालय प्रत्येक व्यक्तीसाठी गरजेचे आहे. शौचालयासाठी शासनातर्फे अनुदान दिले जाते. मात्र अनुदान देताना पायाभूत सर्वेक्षणाचा आधार घेतला जातो. शौचालय बांधकामाचा लाभ घेण्यासाठी गावकर्‍यांनी पायाभूत सर्वेक्षणात आपली अद्ययावत माहिती द्यावी तसेच ग्राम सेवकांनी पायाभूत सर्वेक्षणाचे कार्य नियोजित वेळेत पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या ग्राम पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.एन. पुराम यांनी केले.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात नव्याने निर्माण झालेल्या कुटुंबाचे पायाभूत सर्वेक्षण अद्ययावत करण्याच्या सूचना पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे देण्यात आल्या आहेत. १ ते २७ सप्टेंबर या कालावधीत पायाभूत सर्वेक्षणाचे कार्य पूर्ण करण्यात येणार आहे. ग्राम पंचायत स्तरावर ही प्रक्रिया ८ सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आहेत. त्यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षातील सर्व तज्ज्ञांकडून पंचायत समिती स्तरावर ग्राम सेवकांच्या बैठका घेण्यात येत असल्याची माहिती पुराम यांनी दिली.
निर्मल भारत अभियांतर्गत सन २0१२ मध्ये जिल्ह्यातील प्रत्येक ग्राम पंचायतीत पायाभूत सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणानुसारच वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले होते. ते उद्दिष्ट आजपर्यंत नव्याने निर्माण झालेले कुटुंब शासनाच्या या योजनेतून सुटू नये म्हणून पायाभूत सर्वेक्षणाचा हा कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ८ सप्टेंबरला ग्राम पंचायतीत ग्रामसभा घेऊन वाढिव कुटुंबाची नोंद विहित प्रपत्रात करायची आहे. १३ सप्टेंबर पर्यंत वाढीव कुटुंबाचे माहितीचे एकत्रीकरण करुन त्याचा गोषवारा तयार करायचा आहे. १९ सप्टेंबर पर्यंत जिल्हा स्तरावर माहिती एकत्रित करुन विभागाला सादर करायची आहे. ही माहिती विभाग स्तरावररुन शासनाला जाणार आहे. ग्राम पंचायत व पंचायत समितीने वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करायचे आहे. सन २0१२ च्या पायाभूत सर्वेक्षणात ज्या कुटुंबाची नावे सुटली होती. त्या कुटुंबानी ८ सप्टेंबर पूर्वी ग्राम पंचायतीत आपले नाव नोंदवावे असे आवाहनही पुराम यांनी केले आहे.