मधुमिता सिंह गौरवान्वित

0
7

साकोली दि.3: स्थानिक एम.बी. पटेल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची एम.ए. इंग्रजी विषयाचे विद्यार्थीनी मधुमिता सिंह हिचा रातुम नागपूर विद्यापीठाच्या १0२ व्या दीक्षांत समारंभात आठ सुवर्णपथकांनी सन्मानित करण्यात आले. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक आठ सुवर्ण पदक प्राप्त करण्याचे श्रेय पहिल्यांदाच मधुमिता सिंह यांना मिळाले आहे.भविष्यात आपण एक यशस्वी प्राध्यापक म्हणून समाजसेवा करण्याचा मनोदय मधुमिता सिंह यांनी व्यक्त केला. तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.