रस्त्यांसाठी वापरले बनावट बिटूमन

0
14

गोंदिया,दि.3-रस्त्यांच्या कामांसाठी बिटूमन मेकॅडम (डांबर आणि खडीचे मिश्रण) वापरले जाते. हे बिटूमन शासकीय परिष्करणीतून अर्थात सरकारी कारखान्यातून खरेदी करणे आवश्यक आहे. शिवाय या बिटूमन योग्य आहे अथवा नाही, हे तपासण्यासाठी बिटूमनची मूळ बीजके सादर करणे आवश्यक आहे. शिवाय सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर,गोंदिया यांनी केलेल्या बिटूमनच्या प्रमाणीकरणावर साशंकता व्यक्त करण्यात आली आहे. गोंदिया आणि नागपूर विभागांतर्गत झालेल्या काही कामांमध्ये कंत्राटदारांकडून बिटूमन बीजके घेण्यातच आली नाही. शिवाय भंडारा, नागपूर आणि यवतमाळ कार्यालयांतर्गत झालेल्या काही कामांमध्ये कंत्राटदारांनी खाजगी यंत्रणेतून बिटूमन घेतल्याचे उघड झाले आहे.या सर्व प्रकारावर कॅगने सुुध्दा ठपका ठेवल्याचे वृत्त असून गोंदिया जिल्ह्यात ही कामे सर्वाधिक अजुर्नी मोरगाव मतदारसंघात असण्याची शक्यता सुध्दा वर्तविली जात आहे.