२० सप्टेंबरला गडचिरोलीत आरक्षणावर चर्चासत्र

0
5

गडचिरोली, दि. १५:सद्य:स्थितीत देशभरात आरक्षणावर विविध प्रकारच्या चर्चा सुरु आहेत. आरक्षणाबाबतची वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी “आरक्षण-समज व गैरसमज” या विषयावर २० सप्टेबर रोजी सकाळी ११ वाजता गडचिरोली येथील धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
निवृत्त सनदी अधिकारी ई.झेड.खोब्रागडे, ओबीसी मुक्ती मोर्चाचे मुख्य संयोजक नितीन चौधरी, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी आदी मान्यवर या चर्चासत्रात मार्गदर्शन करणार आहेत. या चर्चासत्राम ओबीसी कृती समितीचे अध्यक्ष अरुण मुनघाटे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दादाजी चापले, भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष रोहिदास राऊत, ओबीसी कर्मचारी संघटनेचे नेते प्रा.शेषराव येलेकर, बेलदार समाज युवा संघटनेचे नेते प्रा. अनिल पेशट्टीवार,”सिडनी”चे प्रा.डॉ.दिलीप बारसागडे, विशेष मागास प्रवर्ग समितीचे सुरेश पद्मशाली, भारत जनआंदोलनाचे महेश राऊत, बंजारा समाज संघटनेचे रायसिंग राठोड, युवक काँग्रेसचे रजनिकांत मोटघरे, आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे भरत येरमे, गाडीलोहार संघटनेचे सुरेश मांडवगडे, मादगी समाज संघटनेचे समय्या पसुला, धोबी समाज संघटनेचे विजय गोरडवार, कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे गौतम मेश्राम, माळी समाज संघटनेचे पुरुषोत्तम निकोडे, मादगी समाजकल्याण मंचचे काशिनाथ देवगडे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे संदीप राहाटे सहभागी होणार आहेत. नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.