२४ तासात २४.७ मि.मी. जिल्ह्यात सरासरी १०३० मि.मी. पाऊस

0
8

गोंदिया, दि. १८ : जिल्ह्यात १ जून ते १८ सप्टेंबर २०१५ या कालावधीत ३३९८८.७ मि.मी. पाऊस पडला असून त्यांची सरासरी १०३० मि.मी. इतकी आहे. आज १८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यातील एकूण ३३ मंडळात ८१३.४ मि.मी. इतका पाऊस पडला असून त्याची सरासरी २४.७ मि.मी. इतकी आहे.
१८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता पर्यंत तालुकानिहाय पडलेला पाऊस पुढील प्रमाणे असून त्याची सरासरी कंसात दर्शविण्यात आली आहे. गोंदिया तालुका- १७४.४ मि.मी.(२४.९ मि.मी), गोरेगांव तालुका- ११७.२ मि.मी.(३९.१ मि.मी), तिरोडा तालुका- १२७.४ मि.मी.(२५.५ मि.मी), अर्जुनी मोरगाव तालुका- ७९.६ मि.मी. (१५.९ मि.मी), देवरी तालुका- १२१ मि.मी.(४०.३ मि.मी), आमगांव तालुका- ७४.६ मि.मी. (१८.६ मि.मी.), सालेकसा तालुका- ५४.८ मि.मी. (१८.३ मि.मी), आणि सडक अर्जुनी तालुका- ६४.४ मि.मी.(२१.५ मि.मी) असा एकूण ८१३.४ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी २४.७ मि.मी. इतकी आहे.