रविवारला विदर्भ राज्य आंदोलन समितीची बैठक

0
10

नागपूर दि.१८:विदर्भ राज्य आंदोलन समिती, युवा आघाडीची बैठक २० सप्टेंबर विदर्भ राज्य आंदोलन समिती, मुख्य कार्यालय, गिरीपेठ, जे.बी. ठक्कर मार्ग, आर.टी.ओ. कार्यालय जवळ, अमरावती रोड, नागपूरला आयोजित केली आहे. या बैठकीत विदर्भातील ११ हि जिल्ह्याचे जिल्हा युवक अध्यक्ष, तालुका युवक अध्यक्षांची नेमणुक करण्यात येणार आहे. ज्या युवकांना युवा आघाडीचे पदाधिकारी होवून वेगळ्या विदर्भ राज्यासाठी काम करण्याची इच्छा आहे त्यांनी बैठकीला उपस्थित राहावे. जे बैठकीला उपस्थित असेल त्यांनाच जबाबदारी दिल्या जाणार आहेत. बैठकीनंतर ३ महिन्याने विदर्भ प्रदेश युवक कार्यकारिणी नेमण्यात येणार आहे. ज्या युवकांचे त्यांच्या जिल्ह्यात उत्तम काम असेल त्यांना विदर्भ प्रदेश कार्यकारिणी मध्ये घेण्यात येणार आहे..