देशमुख हंगामी नको कायमस्वरूपी अध्यक्ष हवे

0
7

नागपूर दि.१९: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी माजी मंत्री अनिल देशमुख यांची केलेली निवड ही अतिशय योग्य आहे. सद्यस्थितीत त्यांच्यासारखे नेतृत्व शहराला मिळूच शकत नाही. भाजपचे प्राबल्य असलेल्या नागपूर शहरात राष्ट्रवादी वाढवायची असेल तर देशमुख हेच सक्षम अध्यक्ष ठरू शकतात.त्यामुळे पक्षाने त्यांची नियुक्ती हंगामी न करता कायमस्वरूपी करावी, अशी मागणी माजी अध्यक्ष अजय पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
अजय पाटील हे देशमुख विरोधी गटाचे मानले जातात. शहर अध्यक्ष निवडीवरून या दोन्ही नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले होते. मात्र, पक्षाने देशमुख यांच्यावर जबाबदारी सोपविल्यानंतर पाटील यांनी देशमुख यांना पूर्ण सर्मथन असल्याचे जाहीर केले. पाटील म्हणाले, काही दिवसांपूर्वी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: अनिल देशमुख यांची नागपूर शहराच्या अध्यक्षपदी निवड केली. परंतु काही लोक जाणीवपूर्वक ही निवड तात्पुरती असल्याचा गैरसमज पसरवित आहेत. शरद पवार यांनी अतिशय विचारपूर्वक ही निवड केली आहे. नागपूर शहराकडे सध्या सर्व देशाचे लक्ष लागले आहे. नागपूर हे संघाचे मुख्यालय असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांचे शहर आहे. येथे भाजपचा पगडा वाढत आहे. यामुळे या शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करणे हे अतिशय कठीण काम आहे.
अनिल देशमुख यांच्या रूपात राष्ट्रवादीला सवरेत्तम अध्यक्ष मिळाले आहेत. या लढाईत आम्ही सर्व देशमुख यांच्या सोबत आहोत, असेही पाटील यंनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला राजेश कुंभलकर, रमण ठवकर, प्रगती पाटील आदी उपस्थित होते.