अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी ,प्रशांत कोरटकरांचा सत्कार

0
22

नागपूर-दि. २०,राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातंर्गत राज्य व विभागीय स्तरावरील अधिस्वीकृती समितीच्या निवडणुका आटोपल्या असून राज्य अध्यक्षपदी महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष यदु जोशी यांची निवड झाली तर नागपूर विभागीय समिती अध्यक्षपदी प्रशांत कोरटकर यांची निवड झाल्याबद्दल येथील टिळक पत्रकार भवनात सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात टिळक पत्रकार भवन ट्रस्ट चे अध्यक्ष प्रदीप कुमार मैत्रा सह वरीष्ठ पत्रकार उन्मेष पवार, जोसेफ राव व शिरीष बोरकर उपस्थित होते. या कार्यक्रमा दरम्यान शहरातील पत्रकारांनी समिती समोर आपल्या समस्या तसेच सूचना मांडल्या.यावेळी मी नेहमी स्वतःला एक कार्यकर्ता समजत आलो आहे. नेतेगिरी मला जमली नाही. धन नसलं तरी मान असलेलं हे पद मला मिळालं आहे या पदाचा उपयोग पत्रकारांच्या कल्याणा साठी व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मी करेन असे प्रतिपादन कार्यक्रमा दरम्यान बोलताना राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी यांनी केले.