विरोधी पक्षनेते विखे पाटील सोमवारी जिल्ह्यात

0
11

गोंदिया,दि.२० : विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे २१ सप्टेंबर रोजी सोमवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. सकाळी ८.३० वाजता रवी भवन नागपूर येथून गोंदियाकडे प्रयाण करतील. सकाळी १०.३० वाजता गोंदिया येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी १ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत पवार बोर्डींग येथे आयोजित जिल्ह्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर निवडून आलेल्या नवनिर्वाचीत सदस्यांच्या सत्कार समारंभाला उपस्थित राहतील. त्यानंतर गोंदिया येथून मोटारीने नागपूरकडे प्रयाण करतील.