सामाजिक न्यायमंत्र्याच्या जिल्ह्यात प्रकल्पग्रस्ताची आत्महत्या

0
8

मोबदला न मिळाल्याने प्रकल्पग्रस्तांने केली आत्महत्या
गोंदिया,दि.२१:-जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कालीमाटी येथील रहिवासी असलेस्या प्रकल्पग्रस्त शेतकर्याने पुनवर्सीत वस्ती श्रीरामनगर जवळील सौंदडच्या तलावात रविवारला उडी घेऊन आत्महत्या केली होती.त्याचे मृतदेह आज सोमवारी आढळले.त्या शेतकर्याचे नाव घनश्याम गेडाम (वय 50 ) असे आहे.सदर शेतकयाची जमीन व घर नवेगावगावबांध न्यु नागझिरा व्याघ्रप्रकल्पामध्ये गेल्याने त्यांना राष्ट्रीय महामागारवरील सौदंड येथे बसविण्यात आले होते.परंतु वनविभागाने या पुनवर्सीत प्रकल्पग्रस्तांना उर्वरित मोबदला अद्यापही दिलेला नाही.घनश्याम गेडाम यांचेही 3 लाख रुपायाचा मोबदला अद्याप त्यांना न मिळाल्याने ते गेल्या तीन महिन्यापासून पुन्हा कालीमाटी येथे जाऊन राहयाला लागले होते.गेल्या तीन चार दिवसापासून कुटुबियासोंबत आता पुढे आपले कसे होईल कसे जगायचे अशा चर्चा करीत असतानाच आज सोमवारला मात्र सौदंडच्या तलावात जाऊन आत्महत्या केली.डुग्गीपार पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली आहे.पालकमंत्री व राज्याचे सामाजिक न्याय मत्री असलेले राजकुमार बडोले यांच्या मतदारसंघातील हा पुनर्वसीत प्रकल्पग्रस्त शेतकरी आहे.
सडक अर्जुनी तालुक्यातील नवेगावबांधच्या राखीव जंगलातील कालीमाटी, झलकारगोंदि, कवलेवाडा या जंगल व्याप्त गावांना २००८ मध्ये पुनर्वसन नोटीस मिळाले होते या नुसार कुटुंबातील प्रत्येकाला १० लाख रुपये, एक हेक्टर जमीन देण्याचे ठरलं होते, २०१२ मध्ये हा क्षेत्र व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित होताच या गावांचा तातडीने पुनर्वसन सौंदड जवळील श्रीरामनगर येथे २०१३-१४ मध्ये करण्यात आले, मात्र शासनाने सांगितल्या प्रमाणे आम्हाला पुनर्वसनाचा योग्य मोबदला दिला नसल्याचा आरोप गावकरी करीत आहेत, १० लाख यैवजी ७ लाखच देण्यात आले आणि आणि शेतीही देण्यात आली नाही, पुनर्वसनाच्या जागी योग्य सुविधा नाहीत हाताला कोणताच काम नाही त्यामुळे आमचा पुनर्वसनाचा परिपूर्ण मोबदला जो पर्यंत मिळणार नाही तो पर्यंत आम्ही पुन्हा आपल्या जुन्याच गावी जावून राहू तिथे शेतीच करू आणि आपली उपजीविका चालवू असा असा पवित्रा घेत ३१६ कुटुंब श्रीरामनगर सोडून मागील तीन महिन्या पासून भर पावसात जंगल व्याप्त त्यांच्या त्याच्या जुन्याच गावात टेण्ट टाकून राहत होते घनश्याम गेडाम या शेतकर्याची नागझिरा व्याघ्र प्रकल्पात ७ एकर जागा गेली असून तो भूमीहीन झाला होता त्यामुळे परिपूर्ण मोबदला न मिळाल्याने आपली उपजीविका कश्या प्रकारे चालविणार असा प्रशन त्याच्या मनात नेहमीच पडत असलायचे कुटूबिय सागत आहेत आतातरी वन विभाग उर्वरित प्रकल्प ग्रस्थ शेतकर्यांच्या मागण्या पूर्ण करतात काय कि घनश्याम गेडाम सारखाच प्रसंग यांच्यावर देखील उदभवण्याची वाट वन विभाग पाहतो काय या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे