मधमाश्यांच्या हल्यात महिलेचा मृत्यु

0
10

गोंदिया , दि. २२-स्वतःच्या शेतात काम करित असलेल्या महिलांवर मधमाश्यांनी हल्ला केल्याची घटना घडली.या हल्लयात जख्मी झालेल्या महिलेचा उपचारादम्यान गोंदियातील शासकीय रूग्णालयात आज 22 सप्टेंबरच्या मध्यरात्री मृत्यु झाल्याची घटना घडली. धानपिकाच्या गोंदिया जिल्हयात सर्वत्र शेतात धानासोबत उगवलेल्या कचरा काढण्याचे काम सुरू असून अश्याच एका शेतात कचरा काढण्याचे काम करित असलेल्या दोन महिलांवर मधमाश्यांनी 21 सप्टेंबरला दुपारच्या सुमारास सालेकसा तालुक्यातील सोनपुरी गावातील शेतात हल्ला केल्याची घटना घडली. पंचफुला धरम बावणकर वय 40 वर्ष व अंजना प्रेम बावणकर वय 35 असे हल्लयात जखमी झालेल्या महिलांची नावे आहेत. लगेच शेजारील शेतातील महिलांना आरडाओरड केल्यानंतर जवळील शेतातील महिला पुरूष गोळा झाले व मधमाश्यांच्या हल्लयात जख्मी झालेल्या महिलांना सालेकसा ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या दोघांची प्रकृती अत्यंत खालावत चालली असल्याचे लक्षात येताच सालेकसाच्या डाॅक्टरांनी जख्मींना गोंदिया जिल्हा रूग्णालयात हलविले.यातील पंचफुला बावणकर चा आज मध्यरात्री 2ः30 वाजताच्या सुमारास गोंदियातील शासकीय रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला. तर दुसरी जख्मी महिला अंजना प्रेम बावणकर वर गोंदियातील रूग्णालयात उपचार सुरू आहे. गोंदिया शासकीय रूग्णालयातील डाॅक्टरांच्या तक्रारीवर गोंदिया शहर पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.