मग्रारोहयो मजुरांच्या मजुरीचा मुद्यावर अधिकारी निरुत्तर

0
6

सदस्य व पदाधिकाèयांना सन्मान देण्याचे श्रीमती मेंढेचे निर्देश

गोंदिया,दि.२८ : – जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तर न देणाèया अधिकाèयांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उषा मेंढे व सभापती पी.जी.कटरे यांनी चांगलीच तंबी दिली.सोबतच सभागृहात पदाधिकारी व सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतांना उडवाउडवीची नको याबाबत काळजी घेण्याचा सल्ला सुध्दा दिला.स्व.वसंतराव नाईक सभागृहातील स्थायी समितीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती उषा मेंढे होत्या.यावेळी उपाध्यक्ष रचना गहाणे,शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी.कटरे,महिला बालकल्याण सभापती विमल नागपूरे,समाजकल्याण सभापती देवराज वडगाये आणि कृषी व पशुसंवर्धन सभापती छाया दसरे,उपमुकाअ राजकुमार पुराम उपस्थित होते.
सभा सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी मागील स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित केलेल्या चिखली जिल्हा परिषद मतदारसंघातील हातपंप प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला.तसेच या प्रकरणात चौकशी करून अहवाल देण्याचे आश्वासन मुकाअ यांनी दिले होते.परंतु अहवाल मिळाला नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत सडक अर्जुनी ते गोंदियाला पत्र पोचायला २८ दिवस लागतात असेही म्हणाले.यावर पाणी पुरवठा विभागाचे कार्य.अभियंता शर्मा यांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.परंतु परशुरामकर यांचे समाधान झाले नाही.त्यावर सभापती पी.जी.कटरे यांनी याप्रकरणाचा अहवाल सादर व्हायला हवा होता,परंतु झालेला नाही तो आल्यावर योग्य काय ती चौकशी होऊन दोषीवर कारवाई करण्यात येईल असे म्हणाले.तसेच अध्यक्ष श्रीमती मेंढे यांनी सुध्दा पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाèयांना योग्य माहिती सादर करण्याचे निर्देश दिले.तसेच परशुरामकर यांनी पाणीपुरवठा विभागात सकाळी १० वाजता कुणीही हजर राहत नसल्याचे सांगत सर्वच कर्मचारी अधिकारी हे विदर्भने ये जा करीत असल्याचा मुद्दा ठेवला.यावर श्रीमती मेंढे यांनी कार्यालयीन वेळ पाळण्यासंबधी निर्देश देत वेळेवर हजर न राहणाèयावर कारवाई करण्याचे निर्देश उपमुकाअ पुराम यांना दिले.सुकडी गटाच्या जि.प.सदस्य रजनी सोयाम यांनी तिरोडा तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या अरेरावीपणाचा मुद्दा उपस्थित केला.तसेच आरोग्याच्या सोयीकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगितले.त्यावर जि.प.सदस्य राजलक्ष्मी तुरकर यांनीही सोयाम यांची बाजू घेत तालुका वैद्यकीय अधिकारी टेंभुर्णे यांचा व्यवहार योग्य नसल्याचा मुद्दा ठेवत महिना लोटूनही आरोग्य विभागाच्यावतीने शालेय स्वच्छता तपासणीचा अहवाल का ठेवला गेला नाही असा प्रश्न उपस्थित केला.त्यावर आरोग्य सभापती पी.जी.कटरे यांनी सदस्यांच्या भावनांचा आदर करीत संबधित तालुका वैद्यकीय अधिकारी यांना समज देण्यात येईल तसेच यापुढे कुठल्याही सदस्यांशी अधिकारी गैरवतुर्णक करणार नाही यासंबधी सर्वांना काळजी घेण्याचे निर्देश देण्याचे आश्वासन सभागृहाला दिले.पिडंकेपारच्या सदस्या श्रीमती सोनवाने यांनी आपण मागील बैठकीत उपस्थित केलेले मुद्दाचे उत्तरच अनुपालन अहवालात नसल्याचे सांगितले.सुरेश हर्षे यांनी आपल्या कट्टीपार मतदारसंघातील समस्या सोडविल्याबद्दल पदाधिकाèयांचे आभार व्यक्त केले.त्यांनतर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुरांना अद्यापही मुजरी मिळाली नसल्याचा मुद्दा परशुरामकर,श्रीमती तुरकर यांनी उपस्थित केला.त्यावर मग्रारोहयचे गटविकास अधिकारी भांडारकर,लपा विभागाचे तत्कालीन कार्य.अभियंता बगमार यांनी आमच्याकडून काम बरोबर असल्याचे उत्तर देण्यात आले.त्यावर उपाध्यक्ष रचना गहाणे यांनी मजुरांचे खाते वेगवेगळ्या तीन चार बँकात राहत असल्याने त्यांची मजुरी थेट बँकेत जमा करण्यास उशीर होत असल्याचे सांगत मजुरावरच खापर फोडले.यावर परशुरामकर यांनी आक्षेप घेत मजुरांचे एकाच बँकेत खाते असते असे सांगून आपल्याकडे असलेल्या मजुरांची यादीच दाखविली.