पोलीस मुख्यालयात लैंगिक अत्याचारावर कार्यशाळा

0
10

गोंदिया,दि.१: इंटरनेशनल जस्टिस मिशन व प्रेरणा संस्था मुंबई यांचेतर्फे बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा सन २०१२, स्त्रिया व मुलींचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा सन २००५ व लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांतील बळीतांबाबत पोलिसांची जबाबदारी या विषयावर पोलीस मुख्यालयात कार्यशाळा पार पडली.
प्रेरणा संस्थेच्या संचालिका प्रिती पाटकर तसेच अमरित कौर व येशुदास नायडू यांनी सदर विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळा पोलीस उप-अधीक्षक सुरेश भवर यांनी आयोजित करून कार्यशाळेकरीता उपस्थित असलेले गोंदिया जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सदर विषयावर अत्यंत मार्गदर्शन मिळाले. सदर कार्यशाळेत उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी तिरोडा डी. बी. ईलमकर, उपविभागीय पोलीस अधिकारी आमगाव दिपाली खन्ना, परि. उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, पोलीस निरीक्षक जयराज रणवरे तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यशाळा यशस्वीकरीता सपोनि सुनिल बाम्डेकर, सपोनि अभिजीत अभंग, रापोउपनि चंद्रबहादुर ठाकूर, पोहवा सुनिल मेश्राम व पोशि राज वैद्य व पोलीस मुख्यालय गोंदिया येथील पोलीस अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.