जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची आवश्यक सभा शनिवारला

0
12

गोंदिया,दि.१ -गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आवश्यक सभा शनिवारला (ता.३) दुपारी २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली गोंदिया येथे आयोजित करण्यात आली आहे. सभेला आमदार राजेंद्र जैन, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, माजी आमदार दिलीप बन्सोड, माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या सभेत नगर पंचायत निवडणूक व संगठनेच्या जिल्हा व तालुका कार्यकारिणीचे पुर्नगठनबाबद चर्चा करण्यात येईल. तरी सभेला सर्व पदाधिकारी व कार्यकत्र्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे यांनी केले आहे.