वरुड येथे संत्रा निर्जलीकरण प्रक्रिया उद्योग उभारणार – मुख्यमंत्री

0
24

अमरावती :दि.१- वरुड येथे संत्रा निर्जलीकरण प्रक्रिया उद्योग उभारणार तर मोर्शी येथे संत्रा रस प्रक्रिया केंद्राला मान्यता दिल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वरुड येथे केली.

जिल्ह्यातील वरुड येथे पंडित दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कृषी विभाग, कृषिमित्र ईव्हेंटस आयोजित राष्ट्रीय कृषी व संत्रा महोत्सव 2015 च्या उद्घाटन प्रसंगी श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी कृषिमंत्री एकनाथराव खडसे, पालकमंत्री प्रवीण पोटे, खासदार रामदास तडस, आनंदराव अडसूळ, आमदार रमेश बुंदिले, फलोत्पादन आयुक्त भारत सरकार डॉ.एस.के.मल्होत्रा, राष्ट्रीय बागवाणी मंडळाचे संचालक डॉ.ए.के.सिंग, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ.रविप्रकाश दाणी, संत्रा उत्पादक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष पी.जी.जगदीश आदी उपस्थित होते.

संत्रा उत्पादकांनी पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रीय शेती याची सांगड घालून उत्पादन वाढीचे प्रयत्न करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी नवीन पिढीला केले. मोर्शी येथील प्रस्तावित रस प्रक्रिया उद्योगाला शाश्वत बाजारपेठ मिळण्यासाठी त्यासोबत जागतिक किंवा देशपातळीवरील नामवंत ब्रँड सोबत जोडावे लागेल. संत्र्याला बाजारपेठ मिळावी म्हणून राज्यातील दहा मोठ्या शहरांमध्ये संत्रा विक्रीसाठी जागा उपलब्ध करुन देण्यात येईल याबाबतीतील शासन निर्णय लवकरच येईल असे ही मुख्यमंत्री यांनी सांगितले.

कृषिमंत्री श्री. खडसे म्हणाले की, राज्यशासन 1 कोटी 35 लाख शेतकऱ्यांचा विमा काढणार असून त्यांचा हप्ता शासनामार्फत भरण्यात येईल. शेतकऱ्याचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास कुटुंबाला 2 लाख रुपये अर्थसहाय्य करण्याची योजना लवकरच कार्यान्वित करणार आहे. केंद्र शासनाने शेतकऱ्यांना सुरु केलेली जीवन विमा योजना टप्याटप्याने राबविण्यात येईल त्याचा हप्ताही पुढील काळात शासन भरेल. संत्रा रोपवाटिका विकसित करणाऱ्या शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान मनरेगातून देणार आहे. सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी ठिबक सिंचनासाठी अमरावती जिल्ह्यासाठी 75 टक्के अनुदान देणार असून शेतकऱ्यांनी भरावयाची 25 टक्के अनुदानाची रक्कम ही अल्प व्याजदरात बँकांमार्फत कर्ज उपलब्ध करुन देऊ. पोषण आहारात संत्र्यांचा समावेश करण्यासाठी चांगल्या दर्जाची संत्र्यांची प्रजाती विकसित करावी लागेल.

यावेळी पालकमंत्री यांनी, जिल्ह्यात संत्रा उत्पादकांसाठी कॉमन फॅसिलीटी सेंटर सुरु करावे अशी मागणी केली. कार्यक्रमात खासदार आनंदराव अडसूळ, रामदास तडस यांनीही विचार व्यक्त केले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्यपाल महाराज, जिल्हाधिकारी किरण गित्ते, कृषी पत्रकार विनोद इंगोले, विजय वरखडे, दीपक कडू, डॉ. नरेशचंद्र काठोळे, वरुड रक्तदाता संघ, प्रदीप सोजतिया, मंगेश ठाकरे आदिंचा सत्कार केला. संत्रा उत्पादक शेतकरी संघाचे संजय घुलक्षे व शेतकऱ्यांनी संत्र्याचा हार घालून मुख्यमंत्री व कृषी मंत्र्यांचा सत्कार केला.
तसेच यावेळी नरेशचंद्र काठोळे लिखीत शेतकऱ्यांची मुलं झाली कलेक्टर व डॉ.दिलीप जाणे लिखीत पुस्तकांचे प्रकाशन यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार डॉ.अनिल बोंडे, सूत्रसंचालन क्षिप्रा मानकर तर आभार प्रदर्शन डॉ.वसुधाताई बोंडे यांनी