प्रेरणादिवसापासून पक्षाला नवी दिशा देऊ-आ.जैन

0
9

गोंदिया,दि.2-गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आज शुक्रवारला महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.यावेळी आमदार राजेंद्र जैन यांनी महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या विचार जगासाठी आजही प्रेरणा देणारे आहेत.महात्मा गांधी यांचे अहिंसात्मक विचार संपूर्ण मानव विकासासाठी मोलाचे असल्याचे सांगत आजच्या प्रेरणादिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात नवी दिशा देऊ असे विचार व्यक्त केले.यावेळी जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे,शहर अध्यक्ष शिव शर्मा,देवेंद्र चौबे,अशोक शहारे,आशा पाटील,पदमचंद जैन,सुरज गुप्ता,केतन तुरकर,सुर्यकांत जायस्वाल,शंकर शहारे,झलकसिंह बिसेन,नानू मुदलियार,घनश्याम मस्करे,गुड्डू बिसेन,रोशन उके,मनोज जोशी,दिपक कनोजे.सुनिल जायस्वाल,स्नहेल हरिणखेडे आदी उपस्थित होते.