छायाचित्रापुरतेच होते सेंट झेवियरचे स्वच्छ अभियान

0
12

विद्यार्थ्यांची सेल्फी काढून शिक्षक करतात स्वच्छ भारत अभियान
गोंदिया,दि.2:- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला संपूर्ण देशात खुप प्रतिसाद मिळत आहे. मात्र हा उपक्रम स्वच्छता करण्याकरीता येत आहे की सेल्फी फोटो काढण्याकरीता आहे. हे अजूनही समजून आले नाही. अशाच काहीसा प्रकार गुरुवारीगोंदिया येथे पाहण्यात आला. गांधी जयंती औचित्य साधून गोंदियाच्या सेंट झेविअर शोळेतील विद्यार्थ्यांनी गुरुवार(दि.1)ला ९ वाजताच्या दरम्यान गोंदिया स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी महाराष्ट राज्य परिवहन मंडळाच्या आगार गाठले.विद्यार्थांनी हातात झाडू घेत स्वच्छता अभियानाला सुरवात केली,मात्र सेंट झेवियरच्या मुख्याध्यापकसाह शिक्षकांना हातात झाळू घेऊन स्वच्छता करायला लाच वाटली असावी म्हणूनच की काय त्यांनी हातात झाडू घेण्याएैवजी स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या विद्याथ्यार्ंचे छायाचित्र काढण्यासाठी आपले मोबाईल घेऊन विद्यार्थांची सेल्फी काढण्यास सुरवात केली.या अभियानात सेंट झेविअर शाळेतील १५० च्या वर विद्यार्थी सहभागी झाले होते.शिक्षक,मुख्याध्यापकांकडे बघून आगारात असलेल्या प्रवाशांच्या मनात मात्र एकच कुजबूज एैकायला मिळाली ती म्हणजे स्वत फोटोत गुंतले आणि विद्य़ार्थांच्या हातात झाडू दिले.