जि.प.परिसर व कार्यालयात स्वच्छता मोहिम

0
7

गोंदिया,दि.२ -जिल्हा परिषदेच्या स्वच्छता मिशनद्वारे राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्वच्छता अभियान (२५ सप्टेंबर ते ११ ऑक्टोंबर) कार्यक़्रमा दरम्यान आज २ ऑक्टोंबरला राष्ट्रपीता महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषदेमध्ये श्रमदानातून कार्यालय स्वच्छता व परिसर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.विशेष म्हणजे या मोहिमेत सहभागी सर्वच पदाधिकारी यांनी हातात झाडू घेऊन काम केले.परंतु संपुर्ण स्वच्छता अभियानात गेल्या अनेक वर्षापासून ठिय्या मांडून बसलेल्या दोन कर्मचार्यानी नेहमीप्रमाणे स्वतःला अधिकारी समजत उभे राहण्यात धन्यता मानली.अशा या स्वच्छता विभागाच्या कर्मचायाचा आढावा घेऊन त्यांची रवानगी करण्यासाठी प्रशासनाने पाऊल उचलायला हवे.गेल्या सात आठ वर्षात त्यांनी दौयाच्या नावावर शासकीय पैशाची उधळपट्टीशिवाय काहीच केले नाही.त्याचाच परिणाम जिल्हा परिषदेचा प्रशासकीय परिसर हा घाणेरडा व केरकचर्याने भरलेला दिसून येतो.
आजच्या कार्यक्रमाला जि.प. अध्यक्षा उषा मेंढे, उपाध्यक्षा रचनाताई गहाणे, सभापती पी.जी.कटरे, विमल नागपुरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.एल. पुराम, राजेश अ.देशमुख, जिल्हा कृषी अधिकारी कु. वंदना शिंदे, कार्यकारी अभियंता यांचेसह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. सुरूवातीला राष्ट्रपती म. गांधी, लाल बहादुर शास्त्री व जयप्रकाश नारायण यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अध्यक्ष यांच्या हस्ते सर्व उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांनी व कर्मचाèयांनी जिल्हा परिषदेचा परिसर स्वच्छ केला. तसेच सर्व विभागातील कर्मचाèयांनी आपल्या कार्यालयाची अंतर्गत स्वच्छता केली. सदर स्वच्छता अभियानातून प्रेरणा घेऊन महिन्यातून एकदा स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जि.प. अध्यक्षा मेंढे यांनी केले. तर उपाध्यक्षा गहाणे यांनी अशी मोहिम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येईल तसेच जि.प. परिसरात असलेल्या कचèयाचे व्यवस्थापन करुन कार्यालयाची नियमित स्वच्छता करण्यात यावी असे सांगितले. या स्वच्छता मोहिमेमध्ये अधिकारी व कर्मचाèयांसोबत पदाधिकारी यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार असल्याचे शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी.कटरे यांनी यावेळी बोलतांना सांगितले. सदर स्वच्छता अभियानामध्ये सामान्य प्रशासन विभाग, समाज कल्याण विभाग, यांत्रिकी उपविभाग, वित्त विभाग, शिक्षण विभाग, पशुसंवर्धन विभाग, एन.आर.एच.एम., महिला व बालकल्याण विभाग, सर्व शिक्षा अभियान, लघु पाटबंधारे विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग उपविभाग इत्यादी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.