नाभिक संघटनेची बैठक शनिवारला

0
11

देवरी,दि.२-महाराष्ट्र नाभिक महामंडळ अंतर्गत नाभिक समाज संघटना गोंदिया जिल्हा कार्यकारिणीची बैठक उद्या शनिवार (ता.३) गोंदिया येथील संतोषी मंदिराच्या सभागृहात सकाळी ११ वाजता आयोजित केली आहे.
या बैठकीला संपूर्ण जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी आणि प्रत्येक तालुका कार्यकारिणीचे कमीतकमी पाच पदाधिकारी अपेक्षीत असून या बैठकीत १० ऑक्टोबरला गोंदिया तालुक्यातील सर्व सलून व्यवसाय बंद ठेऊन शासनास साकोली प्रकरणाचे निषेध आणि समाजाच्या आर्थिक दुर्बलविषयी मागण्यांचे पत्रक जिल्हाधिकारी यांना देण्यासाठी मोर्चा काढण्याविषयी पूर्व तयारीबाबत चर्चा करण्यात येणार आहे. वारंवार सूचना देऊन बैठकीला उपस्थित राहत नाही. अशा पदाधिकाèयांना पदमुक्त करण्यावर चर्चा करून अंतिम रुप देण्यात येणार आहे. तरी सदर बैठकीला सर्व पदाधिकाèयांना उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष राजकुमार प्रतापगडे, सलून व्यवसाय अध्यक्ष दुलीचंद भाकरे, युवाध्यक्ष संजय चन्ने आणि जिल्हा महिला अध्यक्षा अनिता चन्ने यांनी केले आहे.